शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर प्रशासन सजग

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सजग झाले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सजग झाले आहे. येत्या १५ ते २0 आॅगस्टपर्यंत पाणी व चाराटंचाईबाबतचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी टी. जी. कासार यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी बी. एम. निलावाड, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता गंगाधर एंबडवार, चंद्रशेखर सरोदे, एम. आर. कोपलवार आदी अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात १५ ते २0 टक्के पर्जन्यमान असल्याने पिकांची स्थिती गंभीर आहे. त्यातच भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास पाणी व चाराटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनाचे आदेश दिले आहेत. सध्या कोठेही टंचाईची स्थिती नसली तरी ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम झाले. ते पूर्ण झाले असेल तर ती योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यान्वित झाली पाहिजे, अशी भूमिका जिल्हाधिकारी कासार यांनी मांडली. तर तयार असलेल्या सर्व ७६ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे ठरले. पाणीसाठा राखीव करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जि.प.ने पेयजल सुरक्षित अधिनियमानुसार संयुक्त जाहीरनामा काढण्याचे ठरले. त्यात जलसाठ्यांतून पिण्यासाठी सोडला तर इतर कोणत्याही कारणासाठी पाणीउपसा करू नये, असे आदेश देण्यात येणार आहेत. याशिवाय महावितरण कंपनीने वीज जोडणी तोडून पाणीउपसा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही सुचित केले. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत ७५00 हेक्टरवर चारा पीक घेण्यात येणार आहे. त्यात मका, न्यूट्रीफिड गवत, बाजरी प्रत्येक तालुक्यात १५00 हेक्टरवर घेण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे बियाणे वाटप होईल. पशुसंवर्धनतर्फेही बियाणे वाटप करून चारा पीक घेण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जि.प.नेही शेष निधीतून असा उपक्रम राबविण्याची सूचना दिली. जिल्ह्यात ३ लाख ६३ हजार ८७३ जनावरे असून त्यासाठी प्रतिदिन २ हजार मे. टन चारा आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. लघुसिंचन विभागातर्फे पाचही तालुक्यांत प्रत्येकी दोन गावांत जलसंधारणाची कामे सुरू असून २.७८ कोटींचा निधी मंजूर आहे, असे लघुपाटबंधारेचे कोपलवार यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)