शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकरच

By admin | Updated: June 28, 2016 00:50 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी आणि तेथे अध्यापनासाठी शिक्षक जास्त असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी

औरंगाबाद : जिल्ह्यात ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी आणि तेथे अध्यापनासाठी शिक्षक जास्त असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आज सोमवारी शिक्षण समितीच्या बैठकीत सादर केला. त्यानुसार जि.प.च्या अशा १५४ शाळांतील शिक्षकांचे समायोजन जिथे विद्यार्थी संख्या अधिक आहे; पण तिथे शिक्षकांची संख्या कमी आहे, त्या शाळांवर करण्याचा निर्णय सभापती विनोद तांबे यांनी घेतला. यासंबंधीचा प्रस्ताव लगेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठविला जाईल. शाळांच्या गरजेनुसार प्रत्येकी एक याप्रमाणे शिक्षकांना तेथे पाठविले जाईल. नुकतेच जिल्ह्यात विनाअनुदानित तत्त्वावर ३०९ नवीन शाळा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या शाळांना महिनाभराच्या आत जि. प. शिक्षण समितीकडून ३:१ ची मान्यता घेणे बंधनकारक असते. त्यानुसार जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या या शाळांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या असून, आठ दिवसांत यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे त्यांना सांगितले आहे. शासनाची मान्यता मिळालेल्या या शाळांना ३:१ ची मान्यता देण्यापूर्वी संबंधितांनी शाळा सुरू करण्याबाबतच्या निकषांची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही, याची पडताळणी केली जाईल. अलीकडे अनेक ठिकाणच्या जि. प. शाळांमध्ये ८ वी व ९ वीचे वर्ग सुरू करण्याची पालकांची मागणी आहे. त्यानुसार शासन निर्णयाच्या अधीन राहून असे वर्ग सुरू करण्यास जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश दिले जाणार असल्याचे शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सांगितले.या बैठकीस बबन कुंडारे, प्रभाकर काळे, संतोष माने, मधुकर वालतुरे, श्याम राजपूत, आबा जगताप, पुष्पा जाधव, संगीता सुंब, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, उपशिक्षणाधिकारी रमेश तांगडे, सरताज खान पठाण आदींची उपस्थिती होती.जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून अवघ्या ३३ शाळांची दुरुस्ती होऊ शकते. मात्र, सद्य:स्थितीत जवळपास ६० ते ७० शाळा इमारती ४५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. जवळपास २५० ते ३०० शाळांच्या इमारती दुरुस्तीला आलेल्या आहेत. यासाठी पालकमंत्री रामदास कदम आणि जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्याकडे शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपयांचा जास्तीच्या निधीची मागणी केली जाणार आहे, असे शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सांगितले.