शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

आदित्य राज यांची ३५ हजार कि.मी. रायडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:12 IST

पृथ्वीराज, राज, शम्मी आणि शशी या कपूर कुटुंबियांनी चित्रपटात अविस्मरणीय भूमिका करीत चित्रपट रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले. तथापि, कपूर कुटुंबातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शम्मी कपूर यांचे चिरंजीव आदित्य राज कपूर यांनी मात्र चित्रपटातील भूमिकेपेक्षा बाईक रायडिंगचा छंदाला पसंती दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी भारत, रशिया आणि युरोपसह अनेक देशांचे बाईकवरून मार्गक्रमण करीत असताना औरंगाबाद येथे या मोहिमेदरम्यान शनिवारी भेट दिली. या मोहिमेत ३५ हजार कि. मी.पेक्षा जास्त रायडिंग करणाऱ्या आदित्य राज यांचा औरंगाबाद येथील बाईक रायडर्स क्लबने सत्कार केला. या वेळी त्यांनी लोकमतशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

ठळक मुद्देरशियासह १५ देशांची भ्रमंती : मोहिमेदरम्यान औरंगाबादला भेट

जयंत कुलकर्णी ।औरंगाबाद : पृथ्वीराज, राज, शम्मी आणि शशी या कपूर कुटुंबियांनी चित्रपटात अविस्मरणीय भूमिका करीत चित्रपट रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले. तथापि, कपूर कुटुंबातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शम्मी कपूर यांचे चिरंजीव आदित्य राज कपूर यांनी मात्र चित्रपटातील भूमिकेपेक्षा बाईक रायडिंगचा छंदाला पसंती दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी भारत, रशिया आणि युरोपसह अनेक देशांचे बाईकवरून मार्गक्रमण करीत असताना औरंगाबाद येथे या मोहिमेदरम्यान शनिवारी भेट दिली.या मोहिमेत ३५ हजार कि. मी.पेक्षा जास्त रायडिंग करणाऱ्या आदित्य राज यांचा औरंगाबाद येथील बाईक रायडर्स क्लबने सत्कार केला. या वेळी त्यांनी लोकमतशी मनमोकळेपणाने संवाद साधला.ते म्हणाले, ९ जून २०१७ रोजी या मोहिमेला आपण मुंबई येथून प्रारंभ केला; परंतु याचे नियोजन मात्र, एका वर्षाआधीच केले. जेथे आपण जाणार आहोत, तेथील परिस्थिती, हवामान, पुढे कसे मार्गक्रमण करायचे आणि मार्गक्रमण करण्याचा नकाशा याचे पक्के नियोजन केल्यानंतरच आपण मोहिमेस सुरुवात केली. या मोहिमेत आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी समजल्या. जगात अनेक लोक चोर आहेत अशी नकारात्मक भावना असते; परंतु प्रत्यक्षात या मोहिमेदरम्यान अनुभवताना हे सर्व चुकीचेच आहे. सत्य काय असते ते घराबाहेर पडूनच समजते. रशियातील रस्ते चांगले असल्यामुळे प्रतिदिन ८०० कि.मी. आपली रायडिंग असायची. तसेच तेथे रस्त्यावर एक चिटपाखरूही नसायचा आणि दिसायचे ते फक्त १६ चाकी वेगात चालणारी टँकर्स. मात्र, आपण शहराबाहेरच जेवायचे. कारण शहराबाहेर आपुलकी असणारे लोक भेटायचे. रशियात जाण्याआधी आपण तेथील भाषाही शिकलो. एखाद्या मार्गात वस्ती जवळ नसली तर तेथेच झोपायचो. इतर देशांच्या तुलनेत मात्र भारतात रायडिंग खडतर आहे. भारतात लोकसंख्या जास्त आहे आणि रस्तेही अरुंद आहेत.’’अशी झाली रायडिंगला सुरुवातमाझा मुलगा विश्वप्रताप याचा जन्म अमेरिकेतील टेक्सासचा. २0१३ मध्ये आपण रिटायर होत असल्याचे मुलाला फोन करून सांगितले; परंतु मुलाने बाईक चालवण्याचा छंद जोपासण्याची कल्पना सुचवली. माझे जीवन माझ्या कुटुंबातील इतरांपेक्षा तसे वेगळेच. मी अनेक वर्षे लोकल ट्रेनमध्येच प्रवास करून आर. के. स्टुडिओला जायचो. त्यामुळे आयुष्यात कधीही आपण बाईकला हात लावला नव्हता.मात्र, बाईक चालवण्याचा छंद लागल्यानंतर आपण आतापर्यंत ८0 वेळा मोहीम आखताना जवळपास ८0 हजार कि. मी. बुलेट रायडिंग केली. महाराष्ट्र, चेरापुंजी, सिक्कीम, हिमाचल प्रदेश येथेही आपण बाईकवर रायडिंग केल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ६१ वा वाढदिवस त्यांनी रायडिंग करताना रशियाच्या हाय वेवर असतानाच साजरा केला.वडील शम्मी कपूर यांच्याकडून शिकलो पॅशनआई-वडिलांमुळे आपण पॅशन शिकलो. वडील शम्मी कपूर यांनी मी काय करतो ते तू पाहत राहा असे सांगितले. तर आई गीता बाली यांच्याकडून साहसीपणा आणि निडरवृत्ती शिकल्याचे आदित्यराज कपूर यांनी सांगितले. आतापर्यंत आपण १0 चित्रपट केले असून एक सिरिअलही केली आहे, असे ते म्हणाले.अभिनेता धर्मेंद्र यांच्याशी आपले फॅमिली रिलेशन आहे. एक प्रवास करताना धर्मेंद्र यांनी येताना कोल्हापूरला येण्यास सांगितले. कोल्हापूरला तेव्हा यमला पगला या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. त्यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे आपण त्यांना नाही म्हणू शकलो नाही व छोटी भूमिकाही या चित्रपटात केली. या प्रसंगी धर्मेंद्र यांनी गीता बाली यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळाही दिला, असे आदित्य राज कपूर म्हणाले.या वेळी प्रकाश तकाटे, डॉ. सत्यजित पाथ्रीकर, संदीप मुळे, योगेश लोंढे, मनीष दंडगव्हाळ, राहुल औसेकर, रमेश हुर्ने आदी उपस्थित होते.