शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आदिशक्ती मुक्ताई सारी संकटे दूर नेई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 23:50 IST

बीड : पांडुरंग...पांडुरंग हरी.. आदिशक्ती मुक्ताई सारी संकटे दूर नेई यासह इतर अभंग आणि भजनात तल्लीन होत टाळ मृदंगाच्या गजरात संत मुक्ताई पालखीचे मंगळवारी बीड शहरात जोरदार स्वागत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पांडुरंग...पांडुरंग हरी.. आदिशक्ती मुक्ताई सारी संकटे दूर नेई यासह इतर अभंग आणि भजनात तल्लीन होत टाळ मृदंगाच्या गजरात संत मुक्ताई पालखीचे मंगळवारी बीड शहरात जोरदार स्वागत झाले. माळीवेस येथे रिंंगण सोहळ्यानंतर पालखी हनुमान मंदिरात विसावली. बुधवारी पालखीचा बालाजी मंदिरात मुक्काम राहणार असून बुधवारी संत मुक्तार्इंचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीदर्शनानंतर पालखीचे पालीकडे प्रस्थान होईल. सोमवारी नामलगाव येथे पालखीचा मुक्काम होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना रस्त्यावर भाविकांनी स्वागत केले. रथ, बैल, घोडा पालखीचे आकर्षण होते. रस्त्याच्या दुतर्फा बाजुने महिला, पुरुष भाविकांनी पूजन करुन पालखीचे दर्शन घेतले. सुभाष रोड येथे आदर्श मार्केट व्यापारी संघाच्या वतीने फराळ, राजगिरा लाडु, केळी, आंब्याचे वाटप करण्यात आले. या वेळी आरतीनंतर मुक्ताई संस्थानचे प्रमुख अ‍ॅड. रविंद्र पाटील, दिंडी प्रमुख रविंद्र हरणे यांचा अध्यक्ष प्रकाश कानगांवकर, सचिव सुदाम चव्हाण यांनी सत्कार केला. या वेळी अ‍ॅड. सत्यनारायण लाहोटी, नामदेवराव क्षीरसागर, गंमत भंडारी, एपीआय दराडे, डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर आदींसह पत्रकार, व्यापारी उपस्थित होते. तर उज्वल गायकवाड, अश्विन पालसिंगणकर, रितेश कानगावकर, अविनाश कानगावकर, लक्ष्मीकांत सवाई, सुरेश मुळे, अक्षय पाडुळे, मंगेश मुळे, हेमलता पालसिंगनकर, शारदा पालसिंंगनकर, गार्गी पालसिंगनकर, अंजली मुळे, स्नेहल मुळे, आदींनी मसाला दुधाची व्यवस्था केली होती. सारडा संकुल, डीपी रोड भागातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्त्यांनीही फराळाचे वाटप केले. माळीवेस येथे रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर हनुमान मंदिरात आरतीनंतर मुक्ताई संस्थानचे प्रमुख, दिंडी प्रमुखांसह वारकऱ्यांचे विश्वस्त मंडळाने स्वागत केले. नंतर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी पालखी विसावली. दुपारपासून भाविकांनी रांगेत दर्शन घेतले. जिजाऊ धर्मयोद्धा ढोलपथकपालखीच्या स्वागतासाठी शहरातील कबाड गल्लीतील जवळपास पन्नास युवक- युवतीचा सहभाग असलेल्या ‘जिजाऊ धर्मयोद्धा’ ढोल पथकाने तयारी केली होती. पालखी मार्गावर या पथकाची प्रात्यक्षिके आकर्षण ठरले. चहा, फराळाचे वाटपजालना रस्त्यावर रामेश्वर चौधरी, अमोल बहिर, अक्षय आगास यांच्यावतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच मंगलमुर्ती सर्व्हिस सेंटरच्यावतीने चहा देण्यात आला.