शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

संचिकांसाठी अतिरिक्त सीईओंचे ठाण !

By admin | Updated: May 28, 2014 00:21 IST

बीड : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातून मंजूरी मिळालेल्या कामांची माहिती अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे यांनी मागविली होती;

बीड : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातून मंजूरी मिळालेल्या कामांची माहिती अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे यांनी मागविली होती; परंतु दोन महिन्यांपासून त्यांना माहिती मिळाली नाही़ त्यामुळे मंगळवारी ते बांधकाम विभागात दिवसभर ठाण मांडून होते़ जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून बांधकाम १ व २ साठी प्रत्येकी दोन कोटी २० लाख रुपयांची मूळ तरतूद केली होती़ सुधारित अंदाजपत्रकात बांधकाम १ साठी तीन कोटी २० लाख रुपये तर बांधकाम २ साठी तीन कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली़ एकूण ६ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद झाल्यानंतर त्याच्या दीडपट म्हणजे पाऊणे दहा कोटी रुपयांपर्यंतची कामे बांधकाम विभागाला करता येत होती; परंतु प्रत्यक्षात बांधकाम १ ने १० कोटी रुपयांच्या तर बांधकाम २ ने ५ कोटी ३५ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देत कार्यारंभ आदेश काढले आहेत़ या दोन्ही विभागाने मिळून १५ कोटी ३५ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यता दिल्या असून काही कामांची बिलेही निघाली आहेत़ बांधकाम विभागातून नेमक्या किती कामांना प्रशासकीय मंजुरी दिली?, किती कामांना तांत्रिक मान्यता दिल्या? किती कामांचे कार्यारंभ आदेश दिले? याबाबतची नोंद बांधकाम विभागात नव्हती़ त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ आऱ शेंडे यांना नोटीस देऊन माहिती मागविली; परंतु त्यांनी माहिती दिलीच नाही़ त्यानंतर डॉ़ कोल्हे यांनी दुसर्‍यांदा त्यांना नोटीस धाडली; पण याउपरही माहिती देण्याचे टाळले त्यामुळे अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे यांनी मंगळवारी बांधकाम विभाग गाठला़ झेडपीआरच्या संचिकांची सर्व माहिती घेऊनच सायंकाळी त्यांनी कार्यालय सोडले़ कर्मचारी लावले कामाला अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे बांधकाम विभागात धडकले तेंव्हा कर्मचारी चांगलेच धास्तावले़ कार्यकारी अभियंता एस़ आऱ शेंडे रजेवर होते़ डॉ़ कोल्हे यांनी सर्व कर्मचार्‍यांना बांधकाम विभागातून किती कामांच्या प्रशासकीय मान्यता गेल्या? किती कामांचे कार्यारंभ आदेश दिले? याची माहिती एकत्रित करण्यास सांगितले़ त्यानंतर कर्मचारी अंग झटकून कामाला लागले़ (प्रतिनिधी) लेखा विभागाचेही वर हात झेडपीआरच्या कामांच्या किती प्रशासकीय मंजुर्‍या दिल्या? किती कामांची देयके निघाली ? याबाबतची माहिती बांधकाम विभागा बरोबरच लेखा व वित्त विभागाकडूनही मागविली होती. परंतु लेखा विभागाने देखील माहिती दिली नाही. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, अशोक कोल्हे यांच्या पत्राला या विभागाने देखील केराची टोपली दाखविली. बांधकाम तसेच लेखा विभागाकडून झेडपीआरच्या कामाची माहिती दडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.