औरंगाबाद : जिल्ह्यात ४० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर घाटी रुग्णालयात कन्नड येथील शिवाजीनगरातील ४२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात २६ जणांना सुटी देण्यात आली.
आजपर्यंत ४५, ७६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४७, १६० एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण १२४० जणांचा मृत्यू झाला असून एकूण १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीत ३५ रुग्ण
नक्षत्रवाडी २, बीड बायपास १, क्रांती चौक १, आरेफ कॉलनी १, गजानन कॉलनी १, जटवाडा रोड १, एन नऊ एम दोन १, शालीमार बाग १, एन चार सिडको १, एसबीआय क्वार्टर १, गारखेडा १, सुराणा नगर १, एन एक सिडको १, पद्मपुरा १, पडेगाव १, अन्य १९.
ग्रामीण भागात ५ रुग्ण
खामगाव, फुलंब्री १, अन्य ४ रुग्ण बाधित आढळून आले.