जालना : जालना जिल्ह्याचा हवामान आधारित पीक विमा योजनेत समावेश करुन शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी हंसादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.राजेश सरकटे यांनी केली. याविषयी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी एक निवेदन दिले. निवेदनात म्हटले, हवामान आधारित पीक विमा योजनेत राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेत जालना जिल्ह्याचा समावेश नसल्याने येथील शेतकरी योजना तसेच लाभापासून वंचित राहणार आहेत. यंदा जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. बळीराजा हवालदिल आहे. अशा परिस्थितीत या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश केल्यास खरीप पिके तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पिकांचा विमा भरुन योजनेचा लाभ मिळू शकतो. शासनाने ही योजना तात्काळ सुरु करुन लाभ द्यावा, अशी मागणी आहे. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव संजय सरकटे, विनोद सरकटे, नितीन सरकटे, विजय राठोड, विवेक घारे, चिंतामण गाडेकर, आबासाहेब पुणेकर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
पीक विमा योजनेत समावेश करा
By admin | Updated: July 8, 2014 01:00 IST