शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

कार्यकर्ते हिरमुसले

By admin | Updated: February 28, 2017 00:54 IST

उस्मानाबाद : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पाच वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे चळवळीतील विविध पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या जोमाने रिंगणात उतरले होते

उस्मानाबाद : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पाच वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे चळवळीतील विविध पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या जोमाने रिंगणात उतरले होते. मात्र, एक-दोन अपवाद वगळता मनसेसह शेकाप, भारिप, संभाजी ब्रिगेड, एमआयएम, रासप, रिपाइं आदी पक्षांच्या उमेदवारांकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. काही उमेदवारांना तर मतदानाची शंभरीही गाठता न आल्याने या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत अस्वस्थतेचे वातावरण आहे. यंदा प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेडने तीन जिल्हा परिषद गटांसह नऊ पंचायत समिती गणात उमेदवार उतरविले होते. त्याचप्रमाणे भारिप बहुजन महासंघानेही जिल्हा परिषदेच्या चार गटांसह सहा गणांत उमेदवार दिले होते. तर एमआयएमने तीन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती गणातून आपली ताकद आजमावली. याबरोबरच शेकाप, मनसे, रिपाइं, रासप यांचेही उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, बहुतांश उमेदवारांना निराशेचा सामना करावा लागला. प्रमुख चार पक्ष वगळता मतदारांनी या पक्षांकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले. तुळजापूर तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे. सिंदफळ गटातून स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे रिंगणात होते. त्यांना अवघी १८३ मते पडली आहेत. याच गटातून शेतकरी कामगार पक्षातर्फे नेताजी गोरे यांनी निवडणूक लढविली. गोरे यांना २०० मतांवर समाधान मानावे लागले, तर अपक्ष तात्या रोडे यांनी १११ मते मिळविली. काक्रंबा गटातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या नागरबाई कोळेकर यांना ३१७, तर नंदगाव गटातून रासपच्याच सोमनाथ गुड्डे यांना ८५५ मते मिळाली. येथे अपक्ष अंगद सलगर यांना अवघी ९१ मते मिळाली. सिंदफळ गणातून अपक्ष म्हणून छाया कांबळे आणि समाधान धाकतोडे यांनी निवडणूक लढविली. त्यांना अनुक्रमे १६९ व १२२ मते मिळाली. अपसिंग्यातून मनसेच्या महेश जाधव यांना ६५९, तर भारिपच्या दिलीप फडके यांना ४३८ मतांवर समाधान मानावे लागले. काक्रंब्यातून जनहित विकास पार्टीच्या संतोष दूधभाते यांना २४१, मंगरुळमधून अपक्ष सतीश जवळगेकर २६० मते मिळाली. तामलवाडीमधून संभाजी ब्रिगेडच्या वतीने अक्षय नलवडे यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना १६९ मते, तर मनसेच्या अमोल मोटे यांना ५३ मते मिळाली. नंदगाव गणातून रासपच्या वतीने निवडणूक लढविलेल्या सोमनाथ बनसोडे यांना १०६, तर येवती येथील अपक्ष उमेदवार वंदना कांबळे यांना २२८३ आणि खुदावाडीतील अपक्ष उमेदवार उषा राठोड यांना ९३१ मतांवर समाधान मानावे लागले. परंडा तालुक्यातही रासप तसेच मनसेने स्वतंत्रपणे उमेदवार दिले होते. यात रासपच्या वतीने लोणी, जवळा, अनाळा या जिल्हा परिषद गटात असलेल्या तीन उमेदवारांनी मिळून ११९२ मते मिळविली, तर मनसेने शेळगाव, अनाळा, डोंजा या गटात निवडणूक लढविली. तेथे तीन उमेदवारांना मिळून अवघी ६३३ मते हाती लागली. उमरगा तालुक्यात भारिप बहुजन महासंघाने बलसूर गटातून नेताजी गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ३९८, तर माडज गणातील उमेदवार राजेंद्र बिराजदार यांना २४१ मते मिळाली. संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवडणूक लढविलेल्या माडज गणातील चंद्रकांत काळे यांना केवळ १५६ मतांवर समाधान मानावे लागले. अशीच परिस्थिती उमरगा तालुक्यातही राहिली. तालुक्यातील कानेगाव जि.प. गटातून रिपाइंच्या मीनाबाई अर्जुन मुके रिंगणात होत्या. त्यांना ८९४ मते मिळाली, तर माकणी गटातून निवडणूक लढविलेल्या संभाजी ब्रिगेडच्या मधुमती दीपक गोरे यांना अवघी २४८ मते मिळाली. जिल्हा परिषद गटाप्रमाणेच पंचायत समितीसाठी असलेल्या उमेदवारांना अत्यल्प समाधान मानावे लागले. धानुरी गणातून निवडणूक लढविलेल्या सुनीता शिवानंद राठोड यांना १४१, तर सास्तूर गणातील संभाजी ब्रिगेडच्या सुनील दगडू साळुंके यांना अवघी १४८ मते मिळाली. अचलेर गणातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार रवींद्र नवनाथ सोनवणे यांच्या पारड्यात केवळ ७० मते पडली. वाशी तालुक्यात मनसेने तेरखेडा गटातून उमेदवार दिला होता. या उमेदवारालाही केवळ २१० मतांवर समाधान मानावे लागले.कळंब तालुक्यात भारतीय परिवर्तन सेनेच्या उमेदवार विजयी झाल्या असल्या तरी प्रमुख पक्ष वगळता इतर पक्षांकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. मंगरुळ गटातून रासपतर्फे निवडणूक लढविलेल्या अलका लोकरे यांना ४३४, शिराढोण गटातून निवडणूक लढविलेल्या एमआयएमच्या कलीम बागवान यांना ३२७, मोहा गटातून शेकापच्या राजाभाऊ पाटील यांना ३३३, येरमाळा गटातून संभाजी ब्रिगेडच्या वसंत बारकुल यांना १७०, मंगरुळमधून माकपच्या शोभा गायकवाड यांना २२२, तर मंगरुळमधूनच संभाजी ब्रिगेडच्या सत्वशीला वाघमारे यांना २३७ मते मिळाली. डिकसळ गणातून रिपाइं (आठवले) गटाच्या संगीता भालेराव यांना १२४, तर शिराढोण गणातील एमआयएमच्या राम गायकवाड यांना १७६ मते मिळाली. अशीच स्थिती जवळा गणात दिसून आली. तेथे मनसेच्या दत्तात्रय घोगरे यांना ८७, रांजणी गणातील बसपाच्या श्रीमंत गायकवाड यांना १०८, तर डिकसळ गणातील संभाजी ब्रिगेडच्या सोनिया कुरुंद यांना अवघी ६६ मते मिळाली. उस्मानाबाद तालुक्यातही प्रमुख पक्ष वगळता इतर उमेदवारांच्या पदरी निराशा पडली. मात्र बेंबळी गणातून एमआयएमच्या सिद्दीक बावडीवाले यांनी १५५८ इतकी लक्षवेधी मते घेतली. अशीच लढत वडगाव जिल्हा परिषद गटातून अपक्ष दिनेश बंडगर यांनी दिली. त्यांना १५४१ मतांवर समाधान मानावे लागले.