शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारप्रकरणी खैरेंवर कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:49 IST

शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी विकासनिधीतून केलेल्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी विकासनिधीतून केलेल्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.उपविभागीय अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत खासदार खैरे यांनी कन्नड तालुक्यात खासदार निधीतून केलेल्या कामातील गैरव्यवहार समोर आला आहे. यामुळे शासनानेच त्यांच्यावर कारवाई करावी, असे सांगून आ. जाधव म्हणाले की, ज्याप्रमाणे आ. छगन भुजबळ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन तुरुंगात टाकले आहे, त्याचप्रमाणे खैरेंनादेखील तुरुंगात टाकण्यात यावे. लोकप्रतिनिधींच्या निधीतील कामांमध्ये खा. खैरे यांनी केलेला घोळ ही एक प्रकारची चोरीच आहे. भुजबळांना एक न्याय आणि खैरे सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना दुसरा न्याय, हे योग्य वाटत नाही. खैरेंना सत्तेमुळे क्लीन चीट मिळत असेल तर भुजबळांनादेखील तुरुंगातून बाहेर काढावे, अशी मागणी आ. जाधव यांनी केली.खा. खैरेंवर काय कारवाई करणार, याबाबत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकदा भेट घेऊ. पक्षानेदेखील याप्रकरणी आत्मपरीक्षण केले पाहिजे. खैरेंवर कारवाई करण्याऐवजी पक्षविरोधी कृत्य केल्याबद्दल माझ्याच नावाने बिल फाडण्यात येते की काय अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.सर्व लोकप्रतिनिधींच्याकामाची चौकशी कराखा. खैरेंनी यांनी विकासकामात घोळ केल्याचे चौकशी समितीच्या अहवालात उघड झाले आहे. खैरेंप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून केलेल्या कामांची चौकशी झाली पाहिजे. सुरुवात माझ्या मतदारसंघातून केली तरी चालेल. काम न करता मी पैसे उचलले असतील तर मी राजीनामा देतो. अन्यथा खैरेंनी तरी राजीनामा द्यावा, असे आव्हान आ. जाधव यांनी दिले. खा. खैरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी निवडणूक आयोग, अंमलबजावणी संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात येईल., असेही त्यांनी स्पष्ट केले.