शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांवर कारवाई; महिलेने दिली विनयभंगाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 23:44 IST

अंबड : तालुक्यातील महसूल प्रशासन व वाळू माफियांमधील संघर्ष एका वेगळया वळणावर आला आहे.

अंबड : तालुक्यातील महसूल प्रशासन व वाळू माफियांमधील संघर्ष एका वेगळया वळणावर आला आहे. शनिवारी औरंगाबाद येथील महिलेने महसूल पथकातील तलाठी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला विनयभंग केल्याची तर महसूल पथकाने सदर महिलेने अवैध वाळू वाहतुकीची तपासणी करताना सरकारी कामात अडथळा केल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. रात्री उशिरा दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. एकूणच अधिकारी व वाळू माफियांतील संघर्ष तीव्र झाला आहे. तलाठी प्रफुल्ल बाबासाहेब मिसाळ यांनी शनिवारी रात्री उशिरा अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अमृता अकोलकर व तिचा भाऊ यांनी बीड-औरंगाबाद रोडवरील जामखेड फाटा येथे अंबड तहसिल कार्यालयाचे अवैध वाळू वाहतूक प्रतिबंधक पथक अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना अमृता अकोलकर व त्यांचा भाऊ यांनी कर्मचाऱ्यांच्या हातातील पंचनामा हिसकावून शिवीगाळ करत खोटया केसेस दाखल करण्याची धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी प्रफुल्ल मिसाळ यांच्या तक्रारीवरुन अमृता अकोलकर व त्यांच्या भावाविरुध्द कलम ३५३, ५०४, ३४ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. राजपुत करत आहेत. (वार्ताहर)