शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र चोरांवर ‘मोक्का’ची कारवाई

By admin | Updated: July 15, 2015 00:42 IST

औरंगाबाद : शेख इमरान ऊर्फ सुलतान या कुख्यात मंगळसूत्र चोराच्या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इमरानच्या टोळीकडून एक लाख ८३ हजार रुपयांची

औरंगाबाद : शेख इमरान ऊर्फ सुलतान या कुख्यात मंगळसूत्र चोराच्या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इमरानच्या टोळीकडून एक लाख ८३ हजार रुपयांची सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली. ‘सुपारी किलर’ इम्रान मेहदी हा तुरुंगात राहून इमरान टोळी चालवीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. शेख इमरान ऊर्फ सुलतान (३५, रा. वाशी, ह.मु. कटकटगेट, औरंगाबाद), शेख शहेजाद शेख शमीम (३१, रा. सादाबनगर), शेख जावेद शेख मकसूद ऊर्फ टिपू (२१, रा. विजयनगर चौक, गारखेडा) आणि शेख इरफान शेख लाल (२०, रा. गारखेडा), अशी ‘मोक्का’ लावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. असा लागला छडाज्योतीनगर येथील रहिवासी मंगलाबाई देशमुख या २५ जून रोजी सकाळी फिरायला जात होत्या. त्याच वेळी दोन व्यक्ती मोटारसायकलवर आल्या. मंगलाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून त्यांनी पळ काढला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे फौजदार प्रशांत आवारे यांच्या पथकाने केलेल्या तपासात वरील आरोपींनी हा गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. आरोपींना अटक करून गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल (एमएच-२०, बीके-१२१३) उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्यात दिली होती. त्यानंतर उस्मानपुरा ठाण्याचे फौजदार अमोल देशमुख यांनी न्यायालयाच्या आदेशावरून ८ जुलै रोजी आरोपींची ओळख परेड घेतली होती. फिर्यादीने आरोपींना ओळखले. फिर्यादीची सोन्याची पोत शेख शहेजादकडून जप्त करण्यात आली. या आरोपींनी जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत दोन, तर छावणी ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून एक लाख ८३ हजार रुपये किमतीची मंगळसूत्रेही जप्त करण्यात आली.शेख इमरान ऊर्फ सुलतान याने संघटित गुन्हेगारांची टोळी तयार केल्याचे तपासात आढळून आले. आरोपी साथीदारांसह त्याने गेल्या दहा वर्षांच्या काळात खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, चोरी, जबरी चोरी, दरोडा, बेकायदा शस्त्र बाळगणे, फसवणूक करणे आदी २३ गुन्हे केल्याचे सिद्ध झाले. ४या प्रकरणांत आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रेही दाखल करण्यात आली आहेत. सुलतान टोळीच्या कारवाईची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर घेतली.