शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

सापळा लावून पोलिसांची अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 17:22 IST

अवैध वाळू वाहतुक करणा-या ट्रक आणि ट्रॅक्टरवर चिकलठाणा पोलिसांनी गुरूवारी रात्री सापळा रचून  शेंद्रा-भालगाव रस्त्यावर पकडले. या ट्रकमध्ये विना रॉयल्टीची पाच ब्रॉस आणि ट्रॅक्टरमध्ये एक ते दिड ब्रास वाळू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देवाळूपट्टे बंद असताना वाळू माफिया विविध ठिकाणच्या नद्यामध्ये अवैध वाळू उत्खनन करीत आहेत.मुख्य रस्त्याऐवजी अन्य मार्गाचा वापर करून वाळूची चोरटी वाहतुक करीत  असल्याचे पोलिसांना समजले.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ११ : अवैध वाळू वाहतुक करणा-या ट्रक आणि ट्रॅक्टरवर चिकलठाणा पोलिसांनी गुरूवारी रात्री सापळा रचून  शेंद्रा-भालगाव रस्त्यावर पकडले. या ट्रकमध्ये विना रॉयल्टीची पाच ब्रॉस आणि ट्रॅक्टरमध्ये एक ते दिड ब्रास वाळू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूपट्टे बंद असताना वाळू माफिया विविध ठिकाणच्या नद्यामध्ये अवैध वाळू उत्खनन करीत आहेत. उत्खनन केलेली वाळू थेट औरंगाबादेत ट्रक, हायवा आणि ट्रॅक्टरमधून पाठविण्यात येते. गुरूवारी रात्री पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर, उपविभागीय अधिकारी अशोक आमले यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना काही हायवाचालक मुख्य रस्त्याऐवजी अन्य मार्गाचा वापर करून वाळूची चोरटी वाहतुक करीत  असल्याचे समजले. यामुळे पोलिसांनी भालगाव ते शेंद्रा या मार्गावर त्यांचे वाहन उभे केले असता वाळू भरून जाणारा हायवा ट्रक आणि ट्रॅक्टर त्यांनी पकडला. 

या वेळी पोलिसांनी वाहनचालक नवनाथ देवीदास कानोले (रा. वाहेगाव) आणि  गणेश किसन कुबेर (रा. भालगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी जालना जिल्ह्यातून ही वाळू आणल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींकडे वाळूच्या रॉयल्टीच्या पावत्या मात्र पोलिसांना आढळल्या नाही. यावरुन ही वाळू बेकायदेशीर असल्याचे समजल्याने ही ट्रक जप्त करून याविषयीचा अहवाल महसूल विभागाकडे  पाठविण्यात आला,अशी माहिती ताईतवाले यांनी दिली.