शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST

औरंगाबाद : शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नाकाबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखील ...

औरंगाबाद : शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नाकाबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता हे मंगळवारी रस्त्यावर उतरले. शहरातील विविध नाकाबंदी पाईंटवर उभे राहून त्यांनी वाहनचालकांना थांबवून कुठे जात आहात आणि घराबाहेर पडण्याचे कारण काय, याविषयी विचारणा केली. दरम्यान, नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५९ नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले. एक अधिकारी आणि दहा पोलीस कर्मचारी प्रत्येक पॉईंटवर तैनात आहेत. असे असताना रस्त्यावरील वाहनांची वर्दळ नजरेस पडते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी मंगळवारी दुपारी अचानक शहरातील विविध चौकात जाऊन पाहणी केली. हर्सूल टी पॉईंट येथे त्यांनी अनेक वाहनचालकांना थांबवून कुठे जात आहात आणि घराबाहेर पडण्याची कारणे विचारली. तेथे बहुतेक शेतकरी शेतमाल घेऊन शहरात आल्याचे आणि बॅंकेत जात आहे. किराणा सामान आणण्यासाठी जात असल्याचे दिसले. जिल्हा बंदीचे उल्लंघन करून वैद्यकीय कारणासाठी शहरात आलेल्या नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्यावर कारवाई न करण्यास सांगितले.

महावीर चौकात त्यांना दोन डॉक्टर विना ई पास नाशिक येथून शहरात आल्याचे आढळून आले. डॉक्टरांना ई पासची आवश्यकता असल्याचे त्यांना माहिती नसल्याचे कारण त्यांनी सांगितले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. उष्माघात टाळण्यासाठी नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी रोटेशननुसार आराम करावा, अशी सूचना त्यांनी केली. नाकाबंदी पॉईंटच्या अधिकाऱ्यांनी याचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नियम मोडणाऱ्या कुणालाही सोडू नका, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोट

संचारबंदीत रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे योग्य आणि समर्पक कारण असल्याचे दिसून आले. विनामास्क आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत.

डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त