उस्मानाबाद : बँक कर्जाचे दोन बोजे कमी करून एक नवीन बोजा टाकून तसा सातबारा उतारा देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच स्विकारणाऱ्या तलाठ्यासह लेखनिकास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात ताब्यात घेतले़ ही कारवाई मंगळवारी पखरूड येथे करण्यात आली़पखरूड येथील तक्रारदाराची व कुटुंबियांच्या नावे असलेल्या शेतजमिनीवरील एका बँकेच्या कर्जाचे दोन बोजे कमी करून नवीन एक बोजा टाकून तसा फेर मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेवून सातबारा उतारा देण्यासाठी पखरूड सज्जाचे तलाठी महेबुब इकबाल अत्तार यांच्याकडे रितसर अर्ज दिला होता़ या कामासाठी तलाठ्यांनी दोन हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीकडे केली होती़ या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक डॉ़ श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक डी़डीग़वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक बी़व्हीग़ावडे यांनी शहानिशा केली़ त्यांचे सहकारी पोनि बी़जी़आघाव, पोहेकॉ रविंद्र कठारे, बसवेश्वर चनशेट्टी, बालाजी तोडकर, नितीन सुरवसे, धनंजय म्हेत्रे, पोकॉ अमोल कुंभार यांच्या सहाय्याने मंगळवारी दुपारी तलाठी सज्जा कार्यालयात सापळा रचला़ त्यावेळी तलाठी महेबुब इकबाल अत्तार यांनी लाचेची मागणी करून ती खासगी लेखनिक नितीन गौतम नाईक यांच्या मार्फत स्विकारल्यानंतर कारवाई केली. या प्रकरणी वाशी ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती़ अधिक तपास उपाधीक्षक बी़व्हीग़ावडे हे करीत आहेत़
लाचप्रकरणी तलाठ्यासह लेखनिकाविरुद्ध कारवाई
By admin | Updated: March 14, 2017 23:56 IST