शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नो एन्ट्रीत प्रवेश करणा-या १४ ट्रॅव्हल्स बसेसवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:15 IST

अपघाताचा धोका टाळण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स बसेसला सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे असताना रविवारी सकाळी ८ वाजता बिनधास्तपणे घुसलेल्या विविध टॅव्हल्सच्या १४ खाजगी बसेसवर सिडको वाहतूक शाखेने कारवाई केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अपघाताचा धोका टाळण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स बसेसला सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे असताना रविवारी सकाळी ८ वाजता बिनधास्तपणे घुसलेल्या विविध टॅव्हल्सच्या १४ खाजगी बसेसवर सिडको वाहतूक शाखेने कारवाई केली. या कारवाईत त्यांच्याकडून १६ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या विविध बसेस नियमित प्रवासी वाहतूक करीत असतात. खाजगी ट्रॅव्हल्स बसेसमुळे शहरात अनेक प्राणान्तिक अपघात झालेले आहेत. या बसेसचा वाढता धोका लक्षात घेत शहर पोलिसांनी ट्रॅव्हल्स बसेसना सकाळी ७ ते रात्री ११ या कालावीत नो एन्ट्री केली आहे. याबाबतची माहिती वाहतूक विभागाने ट्रॅव्हल्स कंपन्यांना कळविली आहे. शिवाय वाहतूक शाखेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे. असे असताना जालन्याकडून येणा-या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस नो एन्ट्रीत शहरात प्रवेश करीत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. यामुळे सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक गिरमे, पोलीस उपनिरीक्षक पी.एम. नवघरे आणि कर्मचाºयांनी रविवारी सकाळी ८ वाजता ट्रॅव्हल्सविरोधात कारवाईसाठी मोहीम उघडली. पाहता-पाहता अर्ध्या तासात १४ खाजगी बसेस त्यांनी पकडल्या. वसंतराव नाईक चौकात सर्व ट्रॅव्हल्सचालकांना नो एन्ट्रीत प्रवेश केल्याबद्दल बाराशे रुपये दंडाची पावती देण्यात आली. या कारवाईने बसचालकांमध्ये खळबळ उडाली.