शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

घोलप यांचे अपहरण करणारे आरोपी अद्याप मोकाटच !

By admin | Updated: June 12, 2014 01:36 IST

वडवणी: तालुक्यातील चिंचवडगाव येथील दत्तात्रय पांडुरंग घोलप यांचे २७ मे रोजी अपहरण करण्यात आले होते.

वडवणी: तालुक्यातील चिंचवडगाव येथील दत्तात्रय पांडुरंग घोलप यांचे २७ मे रोजी अपहरण करण्यात आले होते. तब्बल १५ दिवस उलटूनही हे आरोपी अद्याप मोकाट आहेत. या आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना मंगळवारी देण्यात आले आहे.वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील रहिवासी असलेले दत्तात्रय पांडुरंग घोलप हे २७ मे रोजी रात्रीच्या सुमारास वडवणीहून चिंचवडगावला जात होते. घराकडे परतत असताना गावातील आठ ते दहा जणांनी घोलप यांचे अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. घोलप यांचे अपहरण झाल्यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांंचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. दोन दिवसांनंतर घोलप हे आष्टी तालुक्यातील चुंबळी फाट्यावरील पुलाखाली गंभीर अवस्थेत तेथील नागरिकांना दिसून आले. तेथील नागरिकांनी घोलप यांची मदत करीत पोलिसांशी संपर्क केला. घोलप सापडले त्यावेळेस ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर २९ मे रोजी वडवणी पोलिसांत घोलप यांचे अपहरण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.अपहरण करणारे सत्यप्रेम घुगे, ज्ञानोबा घुगे, वचिष्ठ घुगे, शांतीलाल घुगे, महेश घुगे, धर्मराज घुगे, सूर्यकिरण घुगे यांच्यासह चार जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे. हे अपहरणकर्ते तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही मोकाट असल्याने वडवणी पोलिसांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. हे आरोपी शहरात मोकाट फिरत आहेत. या आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी आश्रुबा घोलप, आसाराम घोलप यांनी केली आहे. वडवणीचे सपोनि संतोष साबळे म्हणाले, आरोपींना लवकरच अटक करू, आम्ही त्यांच्या शोधात आहोत. (वार्ताहर)