शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

छेड काढून पळणाऱ्या आरोपीने पाठलाग करणाऱ्या पीडितेच्या वडिलांवर उगारला चाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

औरंगाबाद : कोचिंग क्लासला जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पीडितेचे मामा आणि वडील धावले ...

औरंगाबाद : कोचिंग क्लासला जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पीडितेचे मामा आणि वडील धावले असता आरोपीने त्यांच्यावर चाकू उगारल्याची खळबजनक घटना २ मार्च रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर परिसरातील गजानननगरात घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ऋषिकेश पालोदकर (रा. पुंडलिकनगर), असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पालोदकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. तो अल्पवयीन असल्यापासून चोरी, घरफोडींचे गुन्हे करतो. पीडित मुलगी दहावीत शिकते. ती मैत्रिणीसोबत परिसरातील एका कोचिंग क्लासला जाते. १५ दिवसांपासून आरोपी रस्त्यात उभा राहून त्यांच्याकडे रोखून पाहत होता. मात्र, मुलींनी त्याकडे दुर्लक्ष केले. १ मार्च रोजी त्याने तिला आणि तिच्या मैत्रिणीला गाठून, ‘तू छत्री का वापरत नाही, रंग काळा पडेल ना’, असे म्हणून छेड काढली. ही बाब पीडितेने वडिलांना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार करू, असे सांगितले. कामावरून यायला उशीर झाल्याने त्यांना पोलीस ठाण्यात जाता आले नाही. दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी रात्री ७ वाजता पीडिता मैत्रिणीसोबत शिकवणी वर्गातून घरी जात असताना आरोपीने तिला पाहून शिटी मारली. घाबरलेल्या मुली घाईत घरी जाऊ लागताच ऋषिकेशने तिला अडवून तिचा हात पकडून तिचे नाव विचारले. तिने आरडाओरड करताच आरोपी त्याच्या साथीदारासह हिंदुराष्ट्र चौकाकडे पळून गेला. तिच्या घराजवळच ही घटना घडल्याने तिचे वडील आणि मामा आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळाले असता साथीदाराने ऋषिकेशला चाकू दिला. हा चाकू मारण्यासाठी त्याने पीडितेच्या वडिलांवर उगारताच ते मागे वळले. यानंतर आरोपी पसार झाले.

=========

पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा

या घटनेनंतर पीडितेसह तिच्या वडिलांनी पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.