शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गहू प्रकरणी आरोपींना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:36 IST

वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळवटा शिवारात एलसीबीच्या पथकाने राशनच्या गव्हासह दोन आरोपी अटक केली होती. त्या आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या छाप्यामुळे वसमत पोलीस उपविभागांतर्गत येणाºया पोलीस ठाणे हद्दीत राशनची तस्करीसह सर्वच अवैधधंद्यांनी जोर धरला असल्याचे स्पष्ट दिसत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळवटा शिवारात एलसीबीच्या पथकाने राशनच्या गव्हासह दोन आरोपी अटक केली होती. त्या आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या छाप्यामुळे वसमत पोलीस उपविभागांतर्गत येणाºया पोलीस ठाणे हद्दीत राशनची तस्करीसह सर्वच अवैधधंद्यांनी जोर धरला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. उपविभागात वाढलेल्या या प्रकारावर पुन्हा एकदा बाहेरच्या विशेष पथकाच्या छाप्याची गरज निर्माण झाल्याचे चित्र आहे.वसमत तालुक्यातील कुरूंदा भाग अवैधधंदे व राशनची तस्करीसाठी सुरक्षित अड्डा झाल्याचे चित्र आहे. कुरूंदा पोलीस ठाणे हद्दीतील चोंडी येथे खुलेआम सुरू झालेल्या मटक्यावर ठाणेदार कारवाई करत नाहीत तर एलसीबीच्या पथकाने छापा मारून तेथे मटका सुरू असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. तोच प्रकार राशनच्या तस्करीसंदर्भातही पहावयास मिळत आहे.वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळवटा शिवारात एलसीबीने राशनच्या गव्हाचा ट्रक पकडला. १० हजार टन गहू व दोन जणांना गजाआड केले.हा ट्रक वसमतहून नांदेडकडे जात होता. जिंतूर टि पॉर्इंटवर वसमत ग्रामीण पोलिसांचा कडक जागता पाहरा असतानाही ट्रक माळवटा शिवारापर्यंत गेला तरी खबर नव्हती. ती खबर एलसीबीला लागली व धान्याचा साठा पकडला. याप्रकरणातील माणिक उर्फ राजू खराटे (रा. कौठा), शेख इझरोद्दीन (रा. नांदेड) या दोन्ही आरोपीस न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या तस्करीत कोण प्रमुख गुन्हेगार आहेत, याचा तपास एलसीबीचे अधिकारी लावतात की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे. शिवाय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.