शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील आरोपी चार महिन्यानंतर अटकेत

By admin | Updated: July 15, 2017 00:17 IST

मानवत : मानवत शहरात चार महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीच्या घटनेतील एका आरोपीस स्थागुशाच्या पथकाने अटक करून ताब्यात घेतले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : मानवत शहरात चार महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीच्या घटनेतील एका आरोपीस स्थागुशाच्या पथकाने अटक करून ताब्यात घेतले आहे़ तसेच त्याच्याकडून २ लाख २६ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे़ न्यायालयाने आरोपी दीपकसिंग टाक यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मानवत नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या रचना कॉलनीतील घरी २३ मार्च रोजी मध्यरात्री धाडसी चोरी झाली होती. या प्रकरणी उमेश ढाकणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या घटनेत ३ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख २५ हजार रुपये लंपास केले होते. भर वस्तीत चोरीची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना तपासही लागत नव्हता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक करीत होते. तपासा दरम्यान या घटनेतील आरोपी मानवत येथेच असल्याची माहिती मिळाली. यावरून दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक (वय २२, रा. गुरूगोविंदनगर, जालना ह.मु. मानवत) यास १२ जुलै रोजी ताब्यात घेतले. चौकशी केली असता ही चोरी केल्याचे टाक याने मान्य केले.त्याच्या घराची झडती घेतली असता २ लाख २६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आढळले. हे दागिने जप्त करण्यात आले आहेत.