शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:27 IST

तीन खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत रुग्णालयातून पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ आरोपीला रामतीर्थ पोलिसांनी उपचारासाठी विष्णूपुरी येथील रुग्णालयात दाखल केले होते़ दोन महिन्यांत रुग्णालयातून आरोपी पळण्याची ही दुसरी घटना आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: तीन खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत रुग्णालयातून पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ आरोपीला रामतीर्थ पोलिसांनी उपचारासाठी विष्णूपुरी येथील रुग्णालयात दाखल केले होते़ दोन महिन्यांत रुग्णालयातून आरोपी पळण्याची ही दुसरी घटना आहे़सरसूदसिंग ऊर्फ शाहू उमरसिंग फौजी (वय ३१) असे आरोपीचे नाव आहे़ त्याच्यावर २०१२ ते २०१४ या काळात मरखेल, बिलोली या ठिकाणी झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा आरोप आहे़ एकूण तीन खून आणि दरोड्यासह इतरही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत़ रामतीर्थ पोलिसांनी त्याला शासकीय कामात अडथळा या गुन्ह्याखाली अटक केली होती़ त्यानंतर २६ आॅगस्ट रोजी या गुन्ह्यातील त्याची शिक्षाही संपली होती, परंतु त्याच्यावर दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांची प्रक्रिया सुरु होती़ त्यातच त्याची प्रकृती बिघडल्याने रविवारी रात्री त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते़ या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाºयांची नजर चुकवून रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्याने रुग्णालयातून पळ काढला़ थोड्याच वेळात कर्मचाºयांना ही बाब समजल्यानंतर सर्वत्र त्याचा शोध घेण्यात आला़, परंतु तो सापडला नाही़