शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वासावर आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: September 24, 2016 00:30 IST

औरंगाबाद : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

औरंगाबाद : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यानंतर येथील ‘राजकारण’ गरम झाले आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, सध्या तरी विरोधकांचे पारडे जड दिसत आहे. गुरुवारी भाजपच्या संचालकांनी काँग्रेसचे दोन व व्यापारी संचालक दोन, अशा चार जणांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. बाहेरगावी असलेले सभापती संजय औताडे जाधववाडीतील कृउबाच्या कार्यालयात आले. आपल्या सहकारी संचालकांसोबत त्यांनी चर्चा केली. यानंतर आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. आमचे संचालक फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘घोडेबाजार’ झाला असून, या कट-कारस्थानामागे थेट विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा हात असल्याचा आरोप औताडे यांनी केला. यावर उपसभापती भागचंद ठोबरे म्हणाले की, सर्व संचालकच सभापतींच्या मनमानी कामकाजाला वैतागले होते. यामुळे अविश्वास प्रस्ताव आणला असून, काँग्रेसचे आणखी तीन संचालक आमच्या संपर्कात असल्याचे सांगून त्यांनी बॉम्बगोळा टाकला. भाजपचे संचालक दामोदर नवपुते म्हणाले की, हरिभाऊ बागडे यांच्याबद्दल बोलण्याची औताडे यांची लायकी नाही. संचालकांना फोडायचे असते तर सुरुवातीलाच ते केले असते. तेव्हा एकाच संचालकाची आम्हाला गरज होती. औताडे सभापती झालेच नसते, असाही टोला त्यांनी लगावला. व्यापारी प्रतिनिधी संचालक प्रशांत सोकिया यांनी सांगितले की, २००७ मध्ये होलसेल किराणा व्यापाऱ्यांसाठी जाधववाडीत प्लॉट देण्याचा निर्णय झाला होता. त्याच मुद्द्यावर आम्ही संजय औताडे यांना पाठिंबा दिला. वर्ष पूर्ण झाले, पण कोणताच ठोस निर्णय घेत नसल्याने अखेर आम्ही त्यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर सह्या केल्या. कृउबा समितीवर २०१५ मध्ये काँग्रेसचे ७ उमेदवार व भाजपचे ७ उमेदवार निवडून आले होते. व्यापारी प्रतिनिधी २ व १ हमाल-मापाडी संचालक व १ अपक्ष म्हणून संजय औताडे निवडून आले होते. औताडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व हमाल-मापाडी संचालक देवीदास कीर्तिशाही यांनी त्यांना पाठिंबा दिला. २ व्यापाऱ्यांनी भाजपला साथ दिली. यामुळे काँग्रेसचे ९ संचालक व भाजपचे ९ संचालक, अशा दोन्ही बाजू समसमान झाल्या होत्या. सभापतीपदासाठी चिठ्ठी टाकण्यात आली. त्याद्वारे सभापतीची माळ काँग्रेसचे संजय औताडे यांच्या गळ्यात पडली. उपसभापती भाजपचे भागचंद ठोंबरे झाले. यास वर्षभराचा कालावधी उलटला. गुरुवारी काँग्रेसच्या सभापतीच्या विरोधात भाजपने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. भाजपने काँग्रेसच्या दोन संचालकांना फोडले. यामुळे आता भाजपचे संख्याबळ ११ झाले आहे. आणखी काँग्रेसचे दोन संचालक संपर्कात असल्याचा दावा उपसभापती भागचंद ठोंबरे यांनी केला आहे. हमाल-मापाडी संचालक कीर्तिशाही काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे सध्या तरी विरोधकांचे पारडे जड दिसत आहे.