शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अहवालानुसार माध्यमिक शाळांची गुणवत्ता कमी

By admin | Updated: July 13, 2016 00:39 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे

औरंगाबाद : केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. संपूर्ण राज्यातील एकाही शाळेची गुणवत्ता आतापर्यंत ७० टक्क्यांच्या पुढे जाऊ शकली नाही. माध्यमिक शाळांची गुणवत्ता किमान ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वाढली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून आॅगस्टपासूनच प्राथमिक शाळांप्रमाणे माध्यमिक शाळांमध्येही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शनिवारी औरंगाबादेत राज्यभरातील सर्व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तसेच सर्व शिक्षण उपसंचालकांची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक नामदेव जरग हे देखील उपस्थित होते. या कार्यशाळेत माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेबद्दल शिक्षण सचिव नंदकुमार यांनी चिंता व्यक्त केली. गुणवत्ता सुधारायची असेल, तर प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा उपक्रम जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित शाळांमध्येही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्याबाबत सूतोवाच करण्यात आले. प्रामुख्याने इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयांमध्ये कमी गुणवत्ता आहे. राज्यातील काही भागात माध्यमिक शाळांची या विषयातील गुणवत्ता कुठे ५३ टक्के, कुठे ६५ टक्के तर कुठे ७० टक्के एवढीच आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक कुठेही गुणवत्ता नाही.किमान ७५ टक्क्यांपर्यंत माध्यमिक शाळांची गुणवत्ता नेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. यासाठी सुरुवातीला तालुक्यातील २-३ शाळांची गुणवत्ता विकसित केली जाईल. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या या शाळा ‘मदर्स स्कूल’ म्हणून संबोधल्या जातील. त्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जाईल. त्यानंतर या मदर्स स्कूल तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करतील. यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच जारी होईल.