शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारताना पोलीस, लिपीक जाळ्यात

By admin | Updated: January 6, 2017 00:19 IST

लातूर : उदगीर आणि लातूर येथे गुरूवारी दुपारी वेगवेगळ्या घटनेत पोलीस कर्मचारी, लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे़

लातूर : उदगीर आणि लातूर येथे गुरूवारी दुपारी वेगवेगळ्या घटनेत पोलीस कर्मचारी, लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे़ याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ लातूर येथील घटनेत कनिष्ठ लिपीक विष्णू तुळशीदास काळे (३४) याने तक्रारदार व त्यांचे मित्र अशा दोघांनी मिळून अहमदपूर येथील एमआयडीसीत व्यवसायासाठी २०१६ मध्ये प्रत्येकी १८०० स्क्वे़ मीटर जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. जागेचा भाडेपट्टा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारदाराने दस्त अभी निर्णयासाठी दाखल केला होता़ त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी भरून दस्त घेऊन तो एमआयडीसी कार्यालय लातूर येथे सादर करावयाचा होता़ सदर दस्तासाठी लागणारे चलन तक्रारदार व त्याच्या मित्राने प्रत्येकी ५ हजार १०० रूपये २ जानेवारी २०१७ रोजी स्टॅम्प ड्युटी भरणा केली होती़ जिल्हाधिकारी कार्यालयात चलन भरण्यात आलेली पावतीही जमा करून दस्त देण्याच्या कामासाठी कनिष्ठ लिपीक विष्णू तुळशीदास काळे याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़ तडजोडीपोटी ठरलेली लाच गुरूवारी दुपारी स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ दुसऱ्या घटनेत उदगीर येथे तक्रारदाराकडून अटक वॉरंटमध्ये अटक न करण्याच्या कामासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार संग्राम सोळंके (वय ४८, शहर पोलीस ठाणे, उदगीर) याने अडीच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती़ दरम्यान, तडजोडीपोटी तक्रारदाराने दोन हजार रूपये देण्याचे मान्य केले़याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे तक्रार दाखल केली़ या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बसस्थानक परिसरात गुरूवारी सापळा लावला़ दुपारी ४़३० वाजण्याच्या सुमारास तक्रारदारांकडून दोन हजार रूपयांची लाच घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार संग्राम सोळुंके याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाणे उदगीर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ पथकात पोलीस निरीक्षक खंदारे, पो़नि़ दराडे, पोक़ॉ़ विष्णू गंडरे, शैलेश सुडे, मोहन सुरवसे, पो़ना़ चंद्रकांत डांगे, पोक़ॉ़ नानासाहेब भोंग, सचिन धारेकर, प्रदीप स्वामी, गोविंद जाधव आदींचा सहभाग होता़ या घटनेमुळे पोलीस वर्तुळ आणि महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे़