शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी

By admin | Updated: August 31, 2014 00:10 IST

परभणी : शनिवारीे परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने हा पाऊस पिकांसाठी पोषक मानला जात आहे.

परभणी : शनिवारीे परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने हा पाऊस पिकांसाठी पोषक मानला जात आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच पावसाने जोर धरल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.मागील दोन महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आॅगस्ट महिन्यातील शेवटचा आठवडा सुखकारक व आशादायक ठरला. या आठवड्यात सलग दोन-तीन दिवस पाऊस झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्याच्या सरासरीमध्ये वाढ होत आहे़ शनिवारी शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते़ त्यामुळे दिवसभरात पावसाची शक्यता वर्तविली जात होती़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला़ १० ते १५ मिनिटे बऱ्यापैकी पाऊस झाला़ त्यानंतर अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू होती़ दुपारी १ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला़ अर्धा ते पाऊण तास हा पाऊस होता़ त्यानंतरही शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरूच राहिला़ रात्री ८ वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता़ या पावसाळ्यातील हा पहिलाच दमदार पाऊस आहे़ पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते़ चाकरमान्यांची पावसाने धावपळ उडाली़ वाघाळ्यात जोरदार पाऊस मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या पावसाने ३० आॅगस्ट रोजी दीड तास धुँवाधार वृष्टी केल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते़ या पावसामुळे वाघाळा परिसरातील ओढे आणि नाल्यांना पाणी आले़ शनिवारी गावात आठवडी बाजार असतो़ पावसामुळे व्यापाऱ्यांचे ओटे पाण्याखाली गेल्यामुळे तारांबळ उडाली़ महालक्ष्मी सणासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची बाजारात गर्दी झाली होती़ परंतु, गुडघाभर पाण्यात उभे राहूनच खरेदी करावी लागली़ गावाशेजारील ओढ्याला पूर आल्याने मुद्गल, सोनपेठ व पाथरीकडे जाणारी वाहतूक उशिरापर्यंत बंद होती़ बसस्थानक परिसर जलमय झाला होता़ जि़प़च्या शाळेलाही तळ्याचे स्वरुप आले होते़ प्राथमिक आरोग्य केंद्रासह त्या शेजारील घरकुलांमध्ये पाणी गेल्याने स्थानिक रहिवाशांचे अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्य भिजले आहे़ वंजार वस्तीत काही घरांमध्ये ओढ्याचे पाणी शिरले होते़ शेतातही माती वाहून गेल्याने बांध फुटले आहेत़ मानवत तालुक्यातही शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ दुपारपासूनच पावसाच्या सरी सुरू होत्या़ पंधरा-वीस मिनिटे मध्यमस्वरुपाचा पाऊस झाल्यानंतर परत रिमझिम आणि पुन्हा १५-२० मिनिटांनी पावसाचा जोर वाढत होता़ असा प्रकार दिवसभर सुरूच होता़ सेलू तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते़ दुपारी हलका पाऊस झाला तर सायंकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे़ गंगाखेड तालुक्यात दुपारी १ तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच होती़ पाथरी तालुक्यातही शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ दुपारी १२़३० ते १़३० या एक तासात जोरदार पाऊस झाला़ दिवसभर रिमझिम सुरू होती़ पालम तालुक्यातही दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली़ तब्बल दोन तास हा पाऊस बरसला़ दिवसभर पावसाची रिपरिप होती़ जिल्ह्यात २२५ मिमी पाऊसजिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी २२५़६२ मिमी पाऊस झाला आहे़ परभणी तालुक्यात २०७़ २४, पालम १६४, पूर्णा २०३़९, गंगाखेड २१५़२५, सोनपेठ २५९, सेलू २१७़७६, पाथरी २५९, जिंतूर २६०़१३ आणि मानवत तालुक्यात २४५़४३ मिमी पाऊस झाला आहे़पूर्णा शहर व परिसरात ३० आॅगस्ट रोजी सकाळपासून संततधार पाऊस व झड सुरू आहे. या ठिकाणी ५० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली़ (प्रतिनिधी)पाणीसाठ्यात अल्पशी वाढ, येलदरीत ४१ टक्के जलसाठाजिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि सेलू तालुक्यातील निम्न दुधना हे मोठे प्रकल्प आहेत़ या दोन्ही प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात अल्पशी वाढ झाली आहे़ येलदरी धरणात ४१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, निम्न दुधना प्रकल्पामध्ये देखील ५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ओढे -नाले पहिल्यांदाच वाहू लागले़ छोट्या मोठ्या नाल्यांना पाणी आले आहे़ या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल़ पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे शनिवारी दीड तास जोरदार पाऊस झाला