शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

By admin | Updated: November 10, 2014 23:58 IST

उस्मानाबाद : उस्मानाबादसह कळंब, तुळजापूर, भूम तसेच वाशी तालुक्याच्या परिसरात सोमवारी दुपारी, सायंकाळी झालेल्या पावसामुळे रबीच्या पिकांना जीवदान मिळाले़

उस्मानाबाद : उस्मानाबादसह कळंब, तुळजापूर, भूम तसेच वाशी तालुक्याच्या परिसरात सोमवारी दुपारी, सायंकाळी झालेल्या पावसामुळे रबीच्या पिकांना जीवदान मिळाले़ काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकरी वर्गातही समाधान व्यक्त होत आहे़यंदा सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगामातील अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही़ परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने रबीचा हंगाम धोक्यात आला असून, उपलब्ध पाण्यावर अनेकांनी रबीची पेरणी केली आहे़ मात्र, कमी प्रमाणात असलेली थंडी आणि जलस्त्रोतातील अपुरे पडत असलेले पाणी यामुळे रबी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत़ ज्वारीसह तूर, हरभरा आदी पिकेही पाण्याअभावी कोमेजू लागली असून, रोगराईचाही प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे काही अंशी दिलासा मिळाला़ उस्मानाबाद शहरासह येडशी, बेंबळी, अंबेवाडी, रूईभर, देवळाली, शिंगोली वडगाव सह ढोकी गोवर्धनवाडी, तडवळा आदी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ रात्री उशिरापर्यंत शहरासह परिसरात पावसाची हजेरी कायम होती़ कळंब शहरासह खामसवाडी, शिराढोण, येरमाळा, उपळा, रत्नापूर, पानगाव, चोराखळी, सापनाई आदी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला़ गंभीरवाडी शिवारात मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या़ तर शिराढोण, घारगाव परिसरात दुपारी व सायंकाळीही पाऊस झाला़ शिवाय तुळजापूर शहरासह परिसरात तसेच तामलवाडी, सांगवी काटी, सुरतगाव, माळुंब्रा, धोतरी, पिंपळा बुद्रुक, पिंपळा खुर्द, सावरगाव, धोत्री आदी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ वाशी शहर व परिसरातही पावसाने हजेरी लावली़ परंडा, उमरगा, लोहारा या तालुक्यातील काही भागात काही वेळ रिमझिम पाऊस झाला़ तर शहरासह परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़ एकूणच उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब व वाशी परिसरात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रबी हंगामातील ज्वारी, तूर, हरभरा आदी पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे़ मात्र, पिकांचे चांगले उत्पन्न मिळण्यासाठी मोठ्या पावसाची आजही शेतकऱ्यांना प्रतिक्षा कायम आहे़दरम्यान, कळंब तालुक्यातील ईटकूर, आंधोरा परिसरातही रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अन्य भागातही आकाशात ढग तसेच विजांचा कडकडाट सुरू होते. भूम शहरातही किरकोळ पावसाच्या सरी कोसळल्या. (प्रतिनिधी)