शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘गुरूगौरव’चा मुहूर्र्त टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:30 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त मागील तीन व यंदाचे पुरस्कार वितरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते़, परंतु यंदाही ५ सप्टेंबरचा मुहूर्त टळला आहे़ १५ सप्टेंबरपर्यंत हा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त मागील तीन व यंदाचे पुरस्कार वितरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते़, परंतु यंदाही ५ सप्टेंबरचा मुहूर्त टळला आहे़ १५ सप्टेंबरपर्यंत हा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गुरूगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते़, परंतु मागील तीन वर्षांपासून हे पुरस्कार रखडले आहेत़ यंदा नव्या पदाधिकाºयांनी हा पुरस्कार सोहळा थाटात करण्याचा संकल्प केला होता़ त्यासाठी शिक्षण विभागानेही तयारी केली होती, परंतु ५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने शिक्षक दिनाचा मुहूर्त टळला़ त्यामुळे आता पुढील दहा दिवसांत हा सोहळा घेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे़नांदेड शहरात ६ किंवा ७ तारखेनंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ त्यामुळे हा पुरस्कार सोहळा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे़ माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे समजते़२०१४ ते २०१६ या वर्षातील रखडलेले पुरस्कार व २०१७ मधील पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा एकाच सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे़ यावर्षीसाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते़ पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या निवडीचे काम संपले असून लवकरच जि़ प़ अध्यक्ष, शिक्षण सभापती यांच्या उपस्थितीत नावे जाहीर होणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी शिवाजी खुडे यांनी सांगितले़