बदनापूर : तालुक्यात एप्रिल ते जून च्या कालावधीकरीता ९० लाख ९० हजार रूपयांचा पुरक पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, मंजुरीकरिता हा आराखडा जिल्हा परिषद व जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात येणार आहे. तालुक्यातील आगामी पाणीटंचाईवर चर्चा करण्याकरिता दि. ५ मे रोजी बदनापूर पंचायत समितीमध्ये पाणीटंचाई आराखडा बैठक झाली. त्यामध्ये विविध गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी विविध उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार पंचायत समितीने पुरक पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये चित्तोडा, आन्वी, आसोला, उज्जैनपुरी, कंडारी बु, काजळा, खामगाव, माात्रेवाडी, दावलवाडी, नजीकपांगरी, पिरसावंगी, राजेवाडी शे, रमदुलवाडी, सुंदरनगर, वंजारवाडी, नागठाणा, साखरवाडी, दाबकातांडा, हालदोला अशा एकूण १२ गावे व ७ वाडी-ताड्यावर एकूण १३ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. यासाठी एकूण २२ लाख १० हजार रूपये खर्च येणार आहे. तालुक्यातील ३८ गावे व १९ वाडी-ताड्यावर ४१ लाख रूपये खर्चून ८२ नवीन विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत. एका गावात १५ हजार रुपये खर्चून १ जलभंजन करणे, १७ गावे व २ वाडी-ताड्यांमध्ये १४ लाख ४५ हजार रूपये खर्चून १९ नळ योजना विशेष दुरूस्ती, दोन गावांत ६ लाखांची तात्पुरती नळयोजना, १९ गावे व ६ वाड्यातांड्यांमध्ये ७ लाख २० खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे अशाप्रकारे तालुक्यातील ८९ गावे व ३४ वाडी-ताड्यांमध्ये एकूण १३७ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच या तालुक्यातील गोकुळवाडी, गोकुळवाडी तांडा, चनेगाव, कडेगाव, माळेगाव, डोंगरगाव दा, बनवाडी, खडकवाडी, बावणे पांगरी, गोकुळनगर तांडा, गारवाडी तांडा, बाजार वाहेगाव, देवगाव, देवगाव तांडा, म्हसला, भातखेडा, साळवेवाडी, रांजणगाव, शेलगाव, सिरसगाव घाटी, कासेवाडी, लालवाडी, वरूडी, वाघ्रुळ दाभाडी, वाघ्रुळ डोंगरगाव, विल्हाडी आदी गावांमध्ये एकही उपाययोजना दाखविलेली नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट व वादळी पावसामुळे रबी पिकांचे व अनेक फळबागांचे करोडो रूपयांचे नुकसान झालेले आहे. याबाबत प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश तेथील ग्रामसेवक, तलाठी व कृषि सहाय्यकांना दिले होते. त्यानुसार काही गावांचे पंचनामे येथील तहसील कार्यालयात सादर केले होते. परंतु अनेक गावांमधील शेतकर्यांनी पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी ा केल्या होत्या. याविषयी तहसीलदार बालाजी क्षरीरसागर म्हणाले, तालुक्यातील ९ ते १० गावांमधील पंचनाम्याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.
पाणीटंचाईचा ९० लाखांचा आराखडा सादर
By admin | Updated: May 16, 2014 00:12 IST