शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्यांना अभय; गरिबांवर टाच!

By admin | Updated: May 14, 2016 00:14 IST

औरंगाबाद : खाम नदीच्या पात्रातील अतिक्रमणे काढण्याच्या मुद्यावरून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

औरंगाबाद : खाम नदीच्या पात्रातील अतिक्रमणे काढण्याच्या मुद्यावरून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नदी पात्रातील मोठ्या अतिक्रमणांना अभय देण्यात येत आहे. गोरगरीब नागरिकांच्या घरांवर बुलडोझर फिरविण्यात येत आहे. शुक्रवारी नदी पात्रातील एकूण ७ अतिक्रमणे हटविल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.बुधवार ११ मे रोजी महापालिकेने खाम नदीच्या पात्रात मोठी कारवाई केली. त्यानंतर गुरुवारी अत्यंत थातुरमातुर स्वरूपात कारवाई करण्यात आली. तिसऱ्या दिवशी तर महापालिकेने फक्त कारवाईची औपचारिकता पूर्ण केली. दिवसभर नदी पात्रातील माती उचलण्याशिवाय दुसरे काहीच काम केले नाही. खाम नदीतील अतिक्रमणे हटविताना अनेक ठिकाणी पथकाकडून मनमानी करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. गुरुवारी एका डीएड कॉलेजचे अतिक्रमण काढताना या भागातील नगरसेवकाने जोरदार विरोध केला. या विरोधासमोर गुडघे टेकत मनपाने काहीच कारवाई केली नाही. महाविद्यालयाच्या इमारतीवर मार्किंग असतानाही फक्त शौचालय पाडण्यात आले. सुरक्षा भिंत जशास तशी ठेवण्यात आली. तसेच वानखेडेनगर भागात एका बिल्डरानेच नाल्याला संरक्षक भिंत बांधली असून, ही भिंत नदीत बांधून जागा हडप करण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या ठिकाणी केवळ २४ मीटर नदीची रुंदी आहे. त्यामुळे गोरगरिबांची घरे पाडण्यापूर्वी मागील बाजूचे म्हणजेच बिल्डरने केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी करीत नागरिकांनी अतिक्रमणे हटविण्यास विरोध केला. खाम नदीत वर्षभरापासून मुख्य मल जलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून चेंबर बांधण्यात आले आहे. खोदकाम करताना निघालेला मलबा मात्र अद्यापपर्यंत उचलण्यात आलेला नाही. या मलब्यामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी तुंबण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी हिलाल आणि जलाल कॉलनीत नदी पात्रात पाणी असल्याचे कारण दाखवून मनपाने मोहीम दुपारीच गुंडाळली.