शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अभयदेवसुरिश्वर महाराजांचे सिडकोत आगमन

By admin | Updated: June 14, 2016 23:59 IST

औरंगाबाद : गुरूराम जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजय अभय महोत्सवांतर्गत मंगळवारी सकाळी ६.३० वाजता आचार्यश्री अभयदेवसुरिश्वरजी महाराज व साधू-साध्वीजींचे सिडकोत आगमन झाले.

औरंगाबाद : गुरूराम जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजय अभय महोत्सवांतर्गत मंगळवारी सकाळी ६.३० वाजता आचार्यश्री अभयदेवसुरिश्वरजी महाराज व साधू-साध्वीजींचे सिडकोत आगमन झाले. सेव्हन हिल परिसरातील इंदरचंद संचेती यांच्या निवासस्थानापासून सकाळी पदयात्रेला सुरुवात झाली. मंगल कलश डोक्यावर घेऊन अग्रभागी महिला चालत होत्या. महाराजांच्या पाठीमागे शिष्य जयघोष करीत चालत होते. जालना रोडमार्गे पदयात्रा सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालय येथे आली. यानंतर आयोजित कार्यक्रमात आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज म्हणाले की, या जगात विश्वविजेते म्हणून अनेक महायोद्धे गाजले. नेपोलियन, सिकंदर, हिटलर अशा महत्त्वाकांक्षी वीरांनी मोठे मोठे विजय प्राप्त केले; परंतु अंती सारेच पराभूत झाले. भगवान महावीरांनी आयुष्यातील प्रत्येक समस्येला अहिंसेच्या मार्गानेच उत्तर शोधले. शस्त्राच्या बळावर जग जिंकू पाहणारे काळाच्या ओघात कुठे गडप झाले कोण जाणे; परंतु आज भगवान महावीर आणि त्यांनी दाखविलेला मार्ग प्रत्येक व्यक्तीच्या मनात, हृदयात वसलेला आहे. त्यामुळेच अहिंसेच्या मार्गाने विजय प्राप्त करवून देणारा, मन:परिवर्तन करणारा मार्ग हाच भगवान महावीरांचा मार्ग ठरतो, असे महाराजांनी सांगितले. यानंतर जिनालयात आचार्यश्रींच्या मार्गदर्शनाखाली संघशांती, गृहशांतीसाठी शांतीधारा अभिषेक करण्यात आला. यावेळी सिडकोतील गुरूगौतम वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघ तसेच अभय महामहोत्सवाचे अध्यक्ष आ.सुभाष झांबड, सुरेश चंडालिया, रतिलाल मुगदिया, नवीनचंद चंडालिया, डॉ. प्रकाश झांबड, जी. एम. बोथरा यांच्यासह सिडकोतील भाविकांची उपस्थिती होती.