बीड : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरु केल्या आहेत़ त्यांनी येथील न्यायालयात त्यासाठी वकीलामार्फत अर्ज केला आहे.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्स सुरु असताना अब्दुल्ला तेथे गेले़ त्यांनी स्थायी समितीतील ठरावावर स्वाक्षरीसाठी धक्काबुक्की करत धमकावल्याची फिर्याद उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती यांनी शिवाजीनगर ठाण्यात दिली़ त्यावरुन गुन्हाही नोंद झाला आहे़ दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी अब्दुल्ला यांनी आपल्या खाजगी वकीलामार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला़ त्यानंतर न्यायालयाने पोलिसांकडे ‘से’ मागितला आहे़ लवकरच ‘से’ सादर केला जाईल, असे सहायक निरीक्षक पी़ डी़ गायकवाड यांनी सांगितले़ आणखी जवाब नोंदविणारव्हिडिओ कॅन्फरन्स सुरु असताना हा प्रकार घडला होता़ त्यामुळे तेथे उपस्थित तीन कर्मचाऱ्यांचे जवाब नोंदविले आहेत़ आणखी कोणी उपस्थित होते का? याची खातरजमा करुन त्यांचेही जवाब घेतले जाणार आहेत़सीसीटीव्ही फुटेजही मिळविणार आहोत, असे सहायक निरीक्षक पी़ डी़ गायकवाड म्हणाले़ (प्रतिनिधी)
अटकपूर्व जामिनासाठी अब्दुल्ला न्यायालयात
By admin | Updated: August 7, 2014 23:34 IST