शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! पाच शासकीय कार्यालयांमध्ये ३५९ तपासण्या, १३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि दिवसभर गर्दी होणाऱ्या पाच शासकीय कार्यालयांमध्ये अँटिजन ...

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि दिवसभर गर्दी होणाऱ्या पाच शासकीय कार्यालयांमध्ये अँटिजन टेस्ट सुरू केली. सोमवारी दिवसभरात ३५९ नागरिकांची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. महापालिका मुख्यालयातून एक जण चक्क पळून गेला. गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच तो स्वतः परतला.

शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिक विविध कामांसाठी येतात. शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची लागण होऊ नये यासाठी महापालिकेने खास तपासणी पथक तैनात केले आहे. सोमवारी महापालिका मुख्यालयात फक्त २७ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तीन जण पॉझिटिव्ह आले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भावसिंगपुरा भागात राहणारा एक नागरिक स्वतःहून तपासणीसाठी आला. त्याला मागील दोन ते तीन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला. पॉझिटिव्ह आल्याचे कळताच त्या नागरिकाने धूम ठोकली. या घटनेमुळे मनपाचे आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना अक्षरशः घाम फुटला. संबंधित नागरिकाला फोनवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. एक तासानंतर हे सद्‌गृहस्थ परत महापालिकेत आले. त्यांना रुग्णवाहिकेमधून सीसीसी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

पोलीस आयुक्त कार्यालयात ३२ पैकी एक जण, जिल्हाधिकारी कार्यालयात ६३ पैकी २, विभागीय आयुक्त कार्यालयात ९४ पैकी २ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. नागरिकांनी तपासणीसाठी स्वतःहून पुढे यावे आणि उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.