शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाची सदस्यसंख्या दीडशेच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:09 IST

चित्रपटसृष्टीतील फसवेगिरीला आळा घालून कलावंत-तंत्रज्ञांच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात मराठवाड्यातील अद्याप दीडशेच्या वर कलाकारांनी सदस्य नोंदणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चित्रपटसृष्टीतील फसवेगिरीला आळा घालून कलावंत-तंत्रज्ञांच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात मराठवाड्यातील अद्याप दीडशेच्या वर कलाकारांनी सदस्य नोंदणी केली आहे.चित्रपटात काम देतो अशी बतावणी करून आर्थिक फवसणुकीचे रॅकेट चालवणारे अनेक तोतया दिग्दर्शक/निर्माते अलीकडच्या काळात समोर आले. ती रोखण्यासाठी यंदाच्या मार्च महिन्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे सुरू झाले. महामंडळातर्फे चित्रपटसृष्टीत काम करणाºया कलाकारांना सदस्य नोंदणीनंतर ओळखपत्र देण्यात येते. त्यांना वैध आॅडिशनची माहिती व मानधन करारनामा बनविण्यात सहकार्य केले जाते. आणि जर सदस्य कलाकाराची फसवणूक झाली तर महामंडळ त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या हक्काचे संरक्षण करते.झगमगाटाच्या या दुनियेविषयी ग्रामीण भागातील मुला-मुलींना सखोल माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याचा धोका अधिक असतो. त्यांच्यामध्ये जनजागृती वाढविण्याची अधिक गरज असल्याचे महामंडळाचे प्रतिनिधी शुभम त्रिभुवन यांनी सांगितले.महामंडळाच्या औरंगाबाद कार्यालयात लेखकांची सर्वाधिक नोंदणी होत आहे. शिवाय औरंगाबाद शहरापेक्षा जालना, परभणी, नांदेड येथील कलाकारांचा प्रतिसादजास्त आहे. गीताची नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असल्याची माहिती प्रतिनिधीने दिली.विभागीय कार्यालयात आतापर्यंत अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, चित्रपट प्रसिद्धी, रंगभूषा, पार्श्वगायक, लेखक, नृत्य दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापन आदी क्षेत्रातील दीडशेच्या वर कलावंत/तंत्रज्ञांनी नोंदणी केलेली आहे, तसेच चित्रपट बॅनर नोंदणीचीही संख्या वाढत आहे.शहरात कार्यालय सुरू होण्यापूर्वी आर्टिस्ट कार्ड काढण्यासाठी मुंबईला जावे लागत असे.मराठवाड्यातील चित्रपटप्रेमी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळातर्फे लवकर शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल (लघु चित्रपट महोत्सव) आयोजित केला जाणार आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीतील यशस्वी कलाकारांसोबत स्थानिक कलावंतांचा संवाद व्हावा म्हणून त्यादृष्टीने प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, तसेच शूटिंग आणि आॅडिशनच्या नावाखाली फसवणूक रोखण्यासाठी भरारी पथकही निर्माण केले जाणार आहे.