शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अहान-पंक्तीची ‘आशिकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:00 IST

कलर्स वाहिनीच्या ‘तू आशिकी’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार पंक्ती शर्मा (जन्नत जुबेर रेहमानी), अहान धनराजगीर (रित्विक अरोरा) आणि उदय (रुषल पारख) मंगळवारी सायंकाळी लोकमत लॉन येथे सखींच्या भेटीला आले होते. यावेळी सखींनी एकच जल्लोष करून ‘तू आशिकी..’ या मालिकेची औरंगाबादमध्ये असलेली लोकप्रियता दाखवून दिली.

ठळक मुद्देलोकमत- कलर्स वाहिनीतर्फे आयोजन : सुरेखा पुणेकर यांची लावणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कलर्स वाहिनीच्या ‘तू आशिकी’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार पंक्ती शर्मा (जन्नत जुबेर रेहमानी), अहान धनराजगीर (रित्विक अरोरा) आणि उदय (रुषल पारख) मंगळवारी सायंकाळी लोकमत लॉन येथे सखींच्या भेटीला आले होते. यावेळी सखींनी एकच जल्लोष करून ‘तू आशिकी..’ या मालिकेची औरंगाबादमध्ये असलेली लोकप्रियता दाखवून दिली.लोकमत सखी मंच आणि कलर्स वाहिनीतर्फे आयोजित सुरेखा पुणेकर यांच्या ‘नटरंगी नार’मध्ये या लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली आणि सखींची मने जिंकून घेतली. मराठमोळ्या लावणीचा आविष्कार पाहण्यासाठी पंक्तीनेही खास मराठमोळी वेशभूषा केली होती. नऊवार साडीतली पंक्ती पाहून सखींना अत्यानंद झाला. अहान आणि पंक्ती यांनी ‘तू आशिकी’ मालिकेच्या शीर्षक गीतावर अप्रतिम नृत्य केले.यानंतर सखींना ‘तू आशिकी’ मालिकेची चित्रफीत दाखविण्यात आली आणि त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. अचूक उत्तर देणाºया संगीता हळदे, नीता ललवाणी, सुशीला महेर, शिवगंगा जायभाय या चार भाग्यवान सखींना अहान आणि उदय यांच्याबरोबर नृत्य करण्याची संधी मिळाली. पंक्तीने या नृत्याचे परीक्षण केले. त्यानंतर कलर्सच्या वतीने अहान आणि उदय यांनी चारही सखींना फुले आणि सरप्राईज गिफ्ट दिले. ‘तू आशिकी’ ही मालिका आता अतिशय रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे.स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी पंक्तीने आता अहानसोबत गायन क्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे चिडलेला जेडी अनिताला म्हणजेच पंक्तीच्या आईला तिचे मनगट पिरगळून अत्यंत क्रूरपणे धमकावतो. यापासून अनभिज्ञ असलेल्या पंक्तीला आपल्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, असेच वाटते. आईची काळजी, जेडीचा रोष आणि गायिका म्हणून स्वत:चे करिअर घडविणे, अशा सर्वच आघाड्यांवर पंक्तीचा सध्या संघर्ष सुरू आहे. अहान सर्वतोपरी पंक्तीला सहकार्य करीत आहे आणि जेडी अनिताचा उपयोग करून पंक्ती आणि अहान यांना वेगळे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. पुढे काय होणार? पंक्तीचा संघर्ष कुठवर यशस्वी होणार, हे जाणून घेण्यासाठी बघत राहा कलर्स वाहिनीवर दर सोमवार ते शुक्रवार सायं. ७ वा. ‘तू आशिकी...’

मनापासून दादलावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि त्यांच्या साथीदारांनी केलेले सादरीकरण लावणीतील आशिकीची जादू दाखविणारे होते. ‘या रावजी...’, ‘दिलबरा करते तुला मुजरा...’, ‘आला आला गोविंदा आला..’, ‘पिकल्या पानाचा..’ या बहारदार लावण्या सखींना ठेका धरायला भाग पाडत होत्या. शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट करून महिलांनी लावणीला मनापासून दाद दिली.