हिंगोली : ‘दोन महिन्यांपासून मानधनाविना काम’ या शिर्षकाखाली गुरूवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच कृषी अधिकारी बी.एस. कच्छवे यांनी तातडीने बैैठक घेतली. वेतनासंदर्भात चर्चा करून ९५ कर्मचाऱ्यांचे मानधनही अदा केले. बैठकीस कळमनुरी तालुका कृषी अधिकारी डी.बी. काळे, पाणलोटचे तंत्र अधिकारी भंडारी आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे मानधन देण्यात आले. जून महिन्यात कर्मचाऱ्यांच्या आॅर्डर उशिरा मिळाल्या. सर्व कर्मचाऱ्यांच्या एकदाच आॅर्डरही मिळाल्या नसल्याने जूनचे मानधन थांबवण्यात आले. आता आॅर्डरच्या दिवसांपासून पुढील दिवसांचे मोजमाप करून मानधन लवकर अदा करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस. कच्छवे यांनी दिली. कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामे करावीत. त्याचे रिर्पोटींग करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारी थांबवण्याचा उद्देश नसल्याचे कच्छवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
९५ कर्मचाऱ्यांना मिळाले मानधन
By admin | Updated: August 21, 2014 23:20 IST