शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

‘जलयुक्त’ लातूरसाठी मुस्लिम समाजाकडून ९ लाखांचा निधी

By admin | Updated: May 22, 2016 00:02 IST

लातूर : मांजरा नदी पुनरुज्जीवन कामास समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाभत आहे़ मुस्लिम समाजानेही एक पाऊल पुढे टाकत या चळवळीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला

लातूर : मांजरा नदी पुनरुज्जीवन कामास समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाभत आहे़ मुस्लिम समाजानेही एक पाऊल पुढे टाकत या चळवळीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला अन् शुक्रवारी दुपारी नमाजनंतर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत जलयुक्तचे मार्गदर्शक डॉ़ अशोक कुकडे यांच्याकडे तब्बल ९ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला़लातूर शहरातील मस्जिद रोडवरील मदरसा मिस्बाहुल उलुम येथे जलयुक्त लातूरच्या व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला़ मरकज मस्जिदीमध्ये नमाज अदा करताना मौलानांनी आवाहन केले, लातूरच्या पाण्याची भिषणता दिवसेंदिवस वाढत आहे़ जलयुक्त लातूर चळवळीने हाती घेतलेले काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे़ त्यामुळे समाजाने घडेल ती मदत करावी़ याची लागलीच सुरूवात झाली असून आता मदतीचा ओघ वाढणार आहे़ मदरसा मिस्बाहुल उलूम येथे मदरशाचे अध्यक्ष मौलाना अ. गफूरसाब यांच्या अध्यक्षतेखाली हा निधी वितरणाचा कार्यक्रम झाला़ यावेळी अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, निलेश ठक्कर, महादेव गोमारे, विक्रांत गोजमगुंडे, योगेश कर्वा, मौलाना मोहियोद्दीन अली, उद्योजक सय्यद सल्लाऊद्दीन, फय्याज पटेल, जमीलनाना यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले, आता पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत़ लातूर शहरातील मस्जिद, मदरशांमध्ये जलपुनर्भरणाचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी आरिफ पटेल, मुफ्ती ओवेस, सय्यद कलीम, मौलाना सोहेल, पाशामियॉं बिरादार, फारुख भाई, कलीम शेख, शेरखॉं पठाण, आयुब तांबोळी आदींही उपस्थित होते.व्हीकेसी प्राईड फुटवेअर कंपनीचे अध्यक्ष व्हीकेसी मोहम्मद कोया हे नवनिर्वाचित आमदार असून त्यांच्या प्रयत्नातून हा निधी जमा करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने उद्योजक सय्यद सल्लाउद्दीन यांनी दोन लाख ५० हजार, अ‍ॅड. जहीरोद्दीन सय्यद व समद काझी यांनी प्रत्येक ५ हजार, सय्यद कलीम यांनी २१०० रुपये व कलीम खोरीवाले यांनी १ हजार रुपये वैयक्तिकरीत्या दिले.