शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

९५ % मतदान, आज फैसला !

By admin | Updated: April 2, 2017 23:45 IST

उदगीर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळासाठी रविवारी शांततेत मतदान झाले़

उदगीर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळासाठी रविवारी शांततेत मतदान झाले़ यावेळी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा झाली आहे़ त्यातूनच कधी नव्हे ते इतके प्रचंड मतदान झाले़ सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल मापाडी, व्यापारी अशा सर्वच गटातून सरासरी ९५़११ टक्के मतदान झाले आहे़ त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सोमवारी दुपारी २ पर्यंत संपूर्ण निकाल येण्याची अपेक्षा आहे़ उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी तालुक्यातील देवर्जन, वाढवणा, नागलगाव, नळगीर, हेर, मोघा व उदगीर शहरातील वेगवेगळ्या १७ केंद्रावर मतदान घेण्यात आले़ सोसायटी मतदारसंघातून ११ जागा निवडून द्यावयाच्या आहेत़ त्यासाठी ७९२ मतदार होते़ त्यापैकी ७८५ जणांनी हक्क बजावला़ सोसायटी मतदारसंघासाठी एकूण ९९़११ टक्के मतदान झाले़ ग्रामपंचायत मतदारसंघात चार जागा आहेत़ येथे ७५८ मतदार होते़ त्यापैकी ७४५ जणांनी मतदान केले़ या मतदारसंघात तब्बल ९८़२८ टक्के मतदान झाले़ व्यापारी गटासाठी बाजार समितीत २ जागा आहेत़ या गटात मतदार तब्बल १३७८ इतके आहेत़ त्यापैकी रविवारी १२३५ जणांनी मतदान केले़ तर हमाल मापाडी गटासाठी असलेल्या एका जागेसाठी झालेल्या लढतीत ४५५ पैैकी ४२६ मतदारांनी मतदान केले़