येणेगूर : उमरगा तालुक्यातील ९६ पैकी ९५ गावातील शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान वाटप करण्यात आले़ मात्र, अल्फाबेटीकल धोरणात शेवटच्या कडेला असलेल्या (वाय अक्षर) येणेगूर गावातील तब्बल ८७० लाभार्थी शेतकरी अद्यापही या अनुदानापासून वंचित आहेत़रबी हंगामात तब्बल १२ दिवस येणेगूर व परिसरात गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ पिके काळी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ पंचनाम्यानंतर तालुक्यातील सर्व गावांना अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले़ येणेगूर येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून शेजारच्या ९ गावातील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले़ मात्र, येणेगूर येथील ८७० शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत़ ८७० हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे़ शेतकरी बँकेत चकरा मारून थकले असून, अल्फाबेटीकली नाव अखेरच्या टप्प्यात असल्याने अनुदान आलेले नाही, शेवटी वाटप होईल, असे सांगण्यात येत आहे़ खरिप पेरणीच्या दिवसात अनुदानाचेही पैसे मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़ (वार्ताहर)निधीची मागणी केली आहेयेणेगूर गावाचे नाव अल्फाबेटीकली अखेरच्या टप्प्यात आहे़ त्यामुळे अनुदान वाटपास विलंब होत आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुदानाची मागणी केली असून, ते उपलब्ध होताच शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येईल, असे उमरग्याचे तहसीलदार उत्तमराव सबनीस यांनी सांगितले़...तर उपोषण करणारखरिपाची पेरणी सुरू असल्याने सर्वच शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे़ मात्र, अल्फाबेटीकली नावामुळे गावातील शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही़ पेरणीचा हंगाम पाहता शेतकऱ्यांना त्वरित अनुदानाचे पैसे उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असे शेतकरी धनराज पाटील यांनी सांगितले़
८७० शेतकरी गारपीट मदतीपासून वंचित
By admin | Updated: July 16, 2014 01:25 IST