शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

२२४ ग्रा.पं.साठी ८५ टक्के मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:47 IST

जिल्ह्यातील दुस-या टप्प्यातील २३२ पैकी २२४ ग्रामपंचातींसाठी शनिवारी सरासरी ८५ टक्के मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील दुस-या टप्प्यातील २३२ पैकी २२४ ग्रामपंचातींसाठी शनिवारी सरासरी ८५ टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. काही ठिकाणच्या केंद्रांवर सायंकाळी पावणेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काही गावांमध्ये बस पोहोचली नाही. त्यामुळे खासगी वाहनांच्या मदतीने मतदान यंत्रे उशिरा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आले.जालना तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ८७ केंद्रावर मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सध्या ग्रामीण भागात पिकांना पाणी देणे, कापूस वेचणी, कीटकनाशक फवारणी आदी कामे सुरू असल्यामुळे मतदारांनी सकाळी शेतात जाण्यापूर्वी मतदान करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सकाळी केंद्रासमोर मतदारांच्या रांगा पहायला मिळाल्या. प्रथम मतदान करणाºया नवमतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारी मतदानाची गती मंदावली. दुपारनंतर सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार बाहेर गावासह शेतात राहणा-या उमेदवारांची विशेष व्यवस्था करून मतदान केंद्रापर्यंत आणताना दिसले. सरपंच व सदस्यपदासाठी एकाच इव्हीएमवर मतदान करावयाचे असल्याने वयोवृद्ध मतदारांमध्ये संभ्रम दिसून आला. तालुक्यातील एकूण ३७ हजार ४०० मतदारांपैकी ३० हजार ४०० मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. १६ हजार ४०० पुरुष तर १३ हजार ९०० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाºया रामनगर ग्रामपंचायतीसाठी ८० टक्के मतदान झाले. सरपंच पदासाठी स्वाती सोपान शेजूळ आणि पार्वती अशोक कल्हापुरे यांच्यात सरळ लढत झाली. यामध्ये मतदारांनी कुणाला कौल दिला याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हडपसावरगाव येथे ८० टक्के मतदान झाले. तालुक्यात सरासरी ८३ टक्के मतदान झाले. सायंकाळी ग्रामीण भागातून आलेली मतदान यंत्रे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जमा करण्यात आल्या. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी तहसीलदार विपिन पाटील, अप्पर तहसीलदार डॉ. शीतल राजपूत, नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांनी काम पाहिले. बदनापूर तालुक्यातील १४, जाफराबाद तालुक्यातील १५, घनसावंगी तालुक्यातील २६, मंठा तालुक्यातील ३५ तर अंबड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान झाले. जाफराबाद तालुक्यातील माहोरा ग्रामपंचातीसाठी ८५ टक्के मतदान झाले.४० ग्रा.पं.साठी ८४ टक्के मतदानअंबड तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींसाठी ८४.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांनी दिली. शुक्रवारी रात्री उशिरा चिंचखेड येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत निवडणूक प्रक्रिया झाली. निवडणुकीसाठी पोलिसांसह राज्य राखीव दलाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तालुक्यातील १२९ मतदान केंद्रावर २५ हजार ३४२ पुरुष (८५.६० टक्के) तर २१ हजार ९६५ महिला (८२.२८ टक्के) अशा एकूण ४७ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय भारस्कर यांनी दिली.परतूर तालुक्यात ८५ टक्के मतदानपरतूर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार डी. डी .फुपाटे यांनी दिली. किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतदारांनी सकाळी पहिल्या टप्प्यात मतदान करण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले. सकाळी साडेनऊ पर्यंंत २२.४२ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३:३० पर्यत ७२.६३ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली.