औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) बाह्यरुग्ण विभाग ते आॅपरेशन थिएटरपर्यंतचा सर्व भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्यात आला आहे. घाटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या ८४ झाली आहे. या कॅमेऱ्यांमुळे रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना होणारी शिवीगाळ, धक्काबुक्की आणि चोऱ्यांच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.घाटी रुग्णालयाच्या विविध वॉर्डांत मोठ्या प्रमाणात रुग्ण अॅडमिट असतात. रुग्णासोबत त्यांच्या नातेवाईकांचीही घाटीत ये-जा असते. बऱ्याचदा रुग्णावर उपचार करण्यावरून निवासी डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये चकमक होते. अशा प्रकारामुळे डॉॅक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. पाच वर्षांपूर्वी घाटीतील एका वॉर्डातून एक बाळ चोरून नेले होते. डॉक्टरांचे लॅपटॉप चोरीला जाण्याचे प्रकारही अलीकडे वाढले आहेत. मागील काही दिवसांत चार लॅपटॉप चोरीला गेले आहेत.
८४ सीसीटीव्हींची घाटीवर करडी नजर
By admin | Updated: August 18, 2014 00:39 IST