शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

सिल्लोड तालुक्यात ८३ टक्के पेरण्या पूर्ण, पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:02 IST

श्यामकुमार पुरे सिल्लोड : तालुक्यात मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस झाल्याने व नेहमीप्रमाणे काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केल्यामुळे ...

श्यामकुमार पुरे

सिल्लोड : तालुक्यात मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस झाल्याने व नेहमीप्रमाणे काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केल्यामुळे आतापर्यंत ८३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने आता ही पिके वाळू लागली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे.

तालुक्यात ९८ हजार ७०६ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ८२ हजार ३४६ हेक्टरवर (८३ टक्के) टक्के खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. तालुक्यातील वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ६५० आहे. मागील दोन वर्षांत सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला होता. मागील वर्षी ७ जुलैपर्यंत २६३ मि.मी. पाऊस झाला होता, तर यावर्षी केवळ १७५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत झालेल्या पावसात सर्वाधिक बोरगाव बाजार मंडळात २५० मि.मी. पाऊस झाला, तर सर्वात कमी अजिंठा सर्कलमध्ये केवळ ७८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात पाऊस नसल्याने जमिनीतून डोके वर काढणारे कोवळे पीक आता कोमेजून जात आहे. आता पाऊस आला तरी पिकांचे झालेले नुकसान भरून निघण्याची शक्यता नाही.

चौकट....

तालुक्यात जून महिन्यातील मंडळनिहाय पाऊस

मंडळ पाऊस

सिल्लोड १९० मि.मी.

भराडी १७३ मि.मी.

अंभई १५७ मि.मी.

अजिंठा ७८ मि.मी.

गोळेगाव १८१ मि.मी.

आमठाणा २३० मि.मी.

निल्लोड १४५ मि.मी.

बोरगाव बा. २५० मि.मी.

सरासरी १७५.५० मि.मी.

चौकट

मंडळनिहाय झालेल्या पेरण्या हेक्टरमध्ये

मंडळ कापूस मका सोयाबीन मिरची अद्रक

आमठाणा २६०३ २२४५ १४३ ४११ ४६५

अजिंठा २७५८ २९१२ ५५६ २६१ ८६

अंभई ३५६२ ५१४७ ५८७ ५२५ ४७८

भराडी ३१६२ २७८१ ३७२ २९६ ३४५

बोरगाव बा. ३४०९ २९६४ २४१ १७२ ३१९

गोळेगाव २५९८ २१०६ २९५ ६५५ १६८

निल्लोड ४३६४ ३८३० १६८ १५६ ३९१

पालोद ३१८० २६०७ ५१५ ४८५ २९३

शिवना २४९३ २११० ६५३ १८५ ७८

सिल्लोड ३५९९ ३०४५ ३१२ २२१ २६५

उंडणगाव २०१८ १९५३ १८० २३४ २०१

..........................................................................................

एकूण ३३७४७ ३१७०० ४०२२ ३५९८ ३०८९

चौकट

सर्वाधिक लागवड कापसाची

तालुक्यात जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काहीएक विचार न करता पेरण्या केल्या आणि अचानक पाऊस उघडल्यामुळे मका, कापूस, सोयाबीन, मिरची, अद्रक, मूग, उडीद, तूर ही पिके धोक्यात आली आहे. तालुक्यात सर्वाधिक ३३ हजार ७४७ हेक्टरवर कापूस, त्यानंतर ३१ हजार ७०० हेक्टरवर मका, ४ हजार २२ सोयाबीन, ३५९८ मिरची, ३०८९ हेक्टरवर अद्रक पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

फोटो : सिल्लोड तालुक्यातील माना टाकत आलेले पीक.