शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

किनवट तालुक्यातील जि.प.च्या ८३ शाळा कायमस्वरुपी बंद होणार

By admin | Updated: June 21, 2014 00:56 IST

गोकुळ भवरे, किनवट वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या किनवट या आदिवासी तालुक्यातील ८३ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत.

गोकुळ भवरे, किनवटवीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या किनवट या आदिवासी तालुक्यातील ८३ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. बंद होणाऱ्या शाळांचे विद्यार्थी संलग्न शाळांना जोडले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ३१ शाळांच्या विद्यार्थ्यांना पर्यायी सोयच नसल्याने ४२८ विद्यार्थ्यांना शाळाबाह्यच रहावे लागणार आहे. किनवट या आदिवासी डोंगराळ तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी-तांडे आहेत.जि. प. च्या २८८ प्राथमिक शाळा कार्यान्वित आहेत. पैकी ८३ शाळांत २० व २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. असे असताना मात्र तेथे द्विशिक्षकी शिक्षकांची नियुक्ती आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याने त्या शाळा बंद करुन तेथील विद्यार्थी संलग्न शाळेत पाठविले जाणार किंवा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये म्हणून वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी शासन पैसेही देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.विशेष म्हणजे ८३ पैकी ३२ शाळा अशा आहेत की, बहुतांश गावांना रस्तेच नाहीत. वनजमिनीतून जाणाऱ्या रस्त्यामुळे गावे पक्क्या रस्त्याने जोडली गेली नाहीत. अशा शाळा कायम बंद झाल्यास तेथील विद्यार्थी हा शाळाबाह्यच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. २० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा कायमस्वरुपी बंद करण्यात येणार असल्याचे नांदेड जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी किनवट दौऱ्यात १९ जून रोजी सांगितले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये म्हणून जेथे वाहन जात नाही, विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था होऊ शकत नाही, अशा दत्तनगर, बोरबनतांडा, शिवनगाव, धानोरा, रामपूर, भामपूर, थारातांडा, प्रेमसिंगतांडा, चंद्रपूरपाटी, गोडखेडा, नागसवाडी, बेंदी, सालाईगुडा, रिंगनवाडी, मथुरातांडा, जगदंबातांडा, खेडी, बेल्लोरी, मांजरीमाथा, वागदरी, भीमपूर, पितांबरवाडी, आनंदवाडी, वसंतवाडी, शिवशक्तीनगर, घोगरवाडी, फुलवाडी, राजगड आदी शाळा कायमस्वरुपी बंद करु नये असा प्रस्ताव शिक्षणाधिकारी व उपसंचालकांकडे पाठविल्याचे गटशिक्षणाधिकरी डी. जी. दवणे यांनी सांगितले. (वार्ताहर)