शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘टोकाई’साठी ८३ उमेदवारी अर्ज

By admin | Updated: May 24, 2016 01:05 IST

वसमत : टोकाई साखर कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली. एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

वसमत : टोकाई साखर कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली. एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी प्रमुख नेते मात्र पहावयास मिळाले नाही. दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांचीच लगबग पहावयास मिळाली. वसमत तालुक्यातील महत्त्वाची संस्था व तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरणारी निवडणूक म्हणून टोकाई साखर कारखान्याकडे पाहिले जात आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच नेते सावध राजकीय हालचाली करत असल्याचे चित्र आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात कुरूंदा गटात १७, गिरगाव गट १३, कौठा गट ९, कोंढूर ६, दांडेगाव १०, उत्पादक गट ५, अनुसूचित जाती जमाती ४, महिला १०, इतर मागास प्रवर्ग ४ तर विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये शंकरराव खराटे, अ‍ॅड. शिवाजी जाधव, अंबादासराव भोसले, चेअरमन निरंजन पाटील इंगोले, बाबूराव भेंडेगावकर, विष्णूदास मुंदडा, देवीदास कऱ्हाळे, शंकरराव नादरे, अरूण नादरे, केशवराव नादरे, शंकरराव कऱ्हाळे, अ‍ॅड. मुंजाजीराव जाधव, शंकरराव खराटे, अशोक खराटे, जगदंबराव साळुंखे, खोब्राजी नरवाडे, मुंजाजी इंगोले, बेगाजी गावंडे, प्रा. सतीश बागल, मधुकर पाष्टे, शिवाजी सवंडकर, राजाराम खराटे, रणधीर तेलगोटे, गौतम दवणे, इंदुमती देशमुख, सुवर्णमाला नलगे, असना इंगोले, सुमनबाई गवारे आदी उमेदवारांचा समावेश आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसोबत पक्षाचे प्रमुख नेते पहावयास मिळाले नाहीत. दुसऱ्या फळीतील कार्यकर्तेच पहावयास मिळाले. यातून प्रमुख नेते या निवडणुकीत चुरस निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करू इच्छित नाहीत, असे दिसते. पडद्यामागून सूत्रधाराची भूमिका ते वठवत आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी हालचाली होत आहेत. टोकाईचे चेअरमन निरंजन पाटील इंगोले, शंकरराव खराटे, अ‍ॅड. शिवाजी जाधव, आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आ. तथा राकाँ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांनी भूमिका अद्याप स्पष्ट केल्या नाहीत. परिणामी, पॅनलचे उमेदवार कोण, हेसुद्धा अस्पष्ट आहे. आता अर्ज परत घेतल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)