शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत ८१ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:41 IST

दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेले तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटवून घेण्याकरिता ९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा न्यायालयात राष्टÑीय लोक अदालतीमध्ये एकूण ३१८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८१ प्रकरणे निकाली लागली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेले तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटवून घेण्याकरिता ९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा न्यायालयात राष्टÑीय लोक अदालतीमध्ये एकूण ३१८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८१ प्रकरणे निकाली लागली आहेत. सदर प्रकरणांत १ कोटी ४९ लाख २९ हजार ८०० रूपये वसूल करण्यात आले. मोटार अपघातातील प्रकरणांची रक्कम संबधित इन्शुरन्स कंपनीकडून तर बँकचे वादपूर्वची रक्कम संबधित व्यक्तींकडून वसूल केली आहे.राज्यातील उच्च न्यायालय व खंडपीठे तसेच जिल्हा, तालुका, कौटुंबिक न्यायालये, इतर न्यायालये-न्यायधिकरणे येथे राष्टÑीय विधीकरण सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये ९ सप्टेंबर रोजी राष्टÑीय लोकअदालत भरविण्यात आली होते. लोक अदालतीमध्ये धनादेश अनादराची प्रकरणे ८५ ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७ निकाली लागली असून यामध्ये ३४ लाख रूपये वसूल करण्यात आले. तर मोटार अपघाताची ९८ पैकी ६८ प्रकरणे निकाली लागले. यामध्ये १ कोटी १३ लाख ५४ हजार ८०० रूपये वसूल झाले. विद्युत चोरीच्या दोनपैकी एक प्रकरण निकाली लागले असून २५ हजार वसूल केले. कौटुंबिक विवादाची १४ पैकी २ प्रकरणे निकाली लागली आहेत. दीड लाख रूपये वसूल केले. दिवाणी स्वरूपाची १८ पैकी ३ प्रकरणे निकाली लागली. तर फौजदारी ९, भूसंपादनाची ६ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवली होती.