शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

८०० ग्राहकांना ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:13 IST

औरंगाबाद : सहा महिन्यांपासून दरमहा ० ते १०० युनिट वीज वापर असलेले शहरातील ८०० ग्राहक वीज चोरीच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सहा महिन्यांपासून दरमहा ० ते १०० युनिट वीज वापर असलेले शहरातील ८०० ग्राहक वीज चोरीच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या ग्राहकांची यादीच महावितरणने पोलिसांना दिली असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. प्रतिदिन ५० ग्राहकांना गुन्हेशाखेत बोलावून त्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.दोन दिवसांपूर्वी वीज चोरीचे चिनी बनावटीचे रिमोट विक्री करणारा मास्टरमाइंड किशोर राईकवार या इलेक्ट्रिशियनसह पोलिसांनी सहा वीज ग्राहकांना अटक केली. शिवाय २२ ग्राहकांविरुद्ध वीजचोरी आणि फसवणूक केल्याप्रकरणी हर्सूल, सिडको आणि जिन्सी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविले. शहरातील अन्य संशयित वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी सुरू असून वीज चोरीची आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आणि कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे. पोलीस आयुक्त याविषयी म्हणाले की, महावितरणने वीज चोरीचा संशय असलेल्या ८०० ग्राहकांचा डाटा पोलिसांना दिला आहे. यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांचा समावेश आहे. शिवाय दरमहा ० युनिट रीडिंग असणे, ० ते ३० युनिट रीडिंग आणि ३० ते १०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांची ही माहिती आहे. दरमहा एकसारखाच वीज वापर कसा काय असू शकतो, असा प्रश्न महावितरण आणि पोलिसांना पडला आहे. महावितरणने वीज वापराच्या टप्प्यानुसार दर ठरविलेले आहे. ३० युनिट आणि ३० ते १०० युनिट आणि १०० ते ३०० युनिट आणि त्यापेक्षा अधिक वीज वापरणारे ग्राहक असे टप्पे आहेत. प्राथमिक तपासात घराबरोबरच, कार्यालये, शाळा अशा ठिकाणचे वीज मीटरदेखील रिमोट अथवा फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे दिसते आहे.