शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनगरात निर्बंधांचे उल्लंघन करणारी ८ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:02 IST

: महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई : कारवाईची माहिती कळताच इतर दुकाने तत्काळ बंद वाळूज महानगर : कोरोना ...

: महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई

: कारवाईची माहिती कळताच इतर दुकाने तत्काळ बंद

वाळूज महानगर : कोरोना निर्बंध काळात दुकाने सुरू ठेवून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बजाजनगरात शुक्रवारी सकाळी ११ वाजेनंतर महसूल व पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबवित ८ दुकाने सील केली.

कोरोनाच्या संसर्गामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडण्यास बंदी आहे. मात्र, बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, जोगेश्वरी, सिडको वाळूज महानगर आदी ठिकाणी जवळपास सर्वच दुकाने सुरू असल्याने लॉकडाऊनचा फज्जा उडत आहे. बजाजनगर परिसरात शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, अप्पर तहसीलदार रतनसिंग साळोक, गटविकास अधिकारी प्रकाश शिरसाट, दीपक बागुल, गणेश धनवई, तलाठी पूनमसिंग राजपूत, भगवान पवार, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके आदींच्या उपस्थितीत कारवाईला सुरुवात करण्यात आली.

या कारवाईत शैलेश तळेकर यांचे नृसिंह युनिफाॅर्म व सुटिंग सेंटर, कुणाल साबू यांचे समर्थ कॉम्प्युटर, मोहटादेवी चौकातील रूपाली सुसर यांचे ओम कलेक्शन, भगत यांचे तिरुमला साडी सेंटर, महावीर धुमाळे यांचे महावीर ज्वेलर्स, महावीर चौकातील आनंद इलेक्ट्रिकल्स, सुमन बोले यांचे एस. एस. ट्रेडिंग, विपुल पटेल यांचे आनंद इलेक्ट्रिकल्स व संतोष धोकट यांचे चिंतामणी अल्युमिनियम अ‍ॅण्ड ग्लास आदी ८ दुकाने सील करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांनी सांगितले.

माहिती मिळताच बाजारपेठा ओस

कारवाईसाठी महसूल व पोलीस प्रशासनाचा ताफा वाहनांसह प्रमुख चौकात येताच अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. या मोहिमेत नियोजनाचा अभाव असल्याने व्यापाऱ्यांनी संधी साधत दुकाने बंद केल्याने मोहिमेचा म्हणावा तसा परिणाम जाणवला नाही.

फोटो ओळ

बजाजनगर परिसरात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांना सील लावताना उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार रतनसिंग साळोक, पो.नि. प्रशांत पोतदार आदी.