शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

जिल्हा परिषदेच्या आठशे शाळा झाल्या ‘हायटेक’

By admin | Updated: July 15, 2016 01:10 IST

विजय सरवदे , औरंगाबाद एकीकडे ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा भविष्यात टिकतील की नाही, या विवंचनेत असलेले शिक्षक अंग झटकून कामाला लागले आहेत

विजय सरवदे , औरंगाबादएकीकडे ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा भविष्यात टिकतील की नाही, या विवंचनेत असलेले शिक्षक अंग झटकून कामाला लागले आहेत. कठोर परिश्रम घेऊन लोकसहभागातून शिक्षकांनी जवळपास ८०० शाळा ‘हायटेक’ केल्या आहेत. विशेष म्हणजे जि. प. शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या संख्येतही अलीकडच्या काळात लक्षणीय वाढ झालेली आहे. जि. प. शाळांमधील शिक्षण म्हटले की सर्वसामान्यांच्या कपाळावर अठ्याच पडतात. जि. प. शाळांमधील मुलांना लिहिता- वाचताही येत नाही, असे बोलले जात असल्यामुळे ग्रामीण नागरिकही खाजगी शाळांनाच पसंती देत आहेत. परिणामी जि. प. शाळांतील विद्यार्थी संख्या घटल्यामुळे दरवर्षी शेकडो शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यावर ‘शिक्षक सेने’ने ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ हा रामबाण उपाय सुचविला. संबंधित शाळांतील शिक्षक व लोकसहभागातून संगणक, टीव्ही स्क्रीन, प्रोजेक्टर घेतले. शिक्षक सेनेने ई- अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर पुरविले. बघता बघता व्हर्च्युअल क्लासरूममुळे शिक्षणात नवचैतन्य आले. अनेक विद्यार्थी शाळेकडे वळू लागले. दर्जेदार व भविष्याचा वेध घेणारे शिक्षण सुरू झाले. मुले चार भिंतीपलीकडे ‘आॅनलाईन’ शोध घेत अध्ययनात रमली. जगाशी ‘व्हर्च्युअल’ नातं जोडल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळू लागल्या. आज दुसऱ्याही संघटनांच्या अनेक शिक्षकांनी ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ सुरू केल्या आहेत.यासंदर्भात शिक्षक सेनेने गेल्या वर्षी ५०० जि. प. शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ केल्याचा दावा जिल्हा सरचिटणीस सदानंद माडेवार यांनी केला. ते म्हणाले की, ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा पठारावस्थेत होत्या. तेथील मुले शाळा सोडून जात होती. अलीकडे व्हर्च्युुअल क्लासरूममुळे शाळांत दर्जेदार शिक्षण मिळू लागल्यामुळे मुले तर सक्षमपणे टिकलीच, पण खाजगी इंग्रजी शाळेत गेलेली मुलेही शाळेत परतू लागली आहेत. गेल्या वर्षी जि. प. शाळांमध्ये सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी संख्या वाढली होती. यंदा किमान पाच हजारांपर्यंत ती संख्या गेली असावी, अशी शक्यता माडेवार यांनी व्यक्त केली. यासोबतच जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेनेही शिक्षक सेनेच्या व्हर्च्युअल क्लासरूम या उपक्रमाला मोलाची साथ देत ५०० पेक्षा जास्त शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ करण्यासाठी मोठा वाटा उचलला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘ज्ञानरचनावाद’मुळे ऊर्जितावस्था तर आलीच, पण व्हर्च्युअल क्लासरूमसारख्या चळवळीने मोठा बदल घडला आहे. ४शाळांना व्यावसायिक दराने वीज बिल आकारली जाते. केवळ वीज बिल न भरल्यामुळे अनेक शाळांमधील कनेक्शन तोडण्यात आलेले आहे. वीज बिलाची तरतूद कशी करणार, हा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे. ४यासंदर्भात शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, जि. प. शाळांना देखभाल, दुरुस्ती आणि शाळा अनुदान दिले जाते. त्यातून त्यांनी वीज बिल भरावे. वीज बिलासाठी शासनाकडून दुसरे कसलेही अनुदान मिळत नाही.