शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीचे ८ सभापती बिनविरोध

By admin | Updated: March 14, 2017 23:52 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडी मंगळवारी झाल्या.

लातूर : लातूर जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडी मंगळवारी झाल्या. भारतीय जनता पार्टीला निलंगा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, चाकूर या ७ पंचायत समितीत बहुमत असल्याने सभापती, उपसभापतींची बिनविरोध निवड झाली. तर काँग्रेसचे जळकोट पंचायत समितीत स्पष्ट बहुमत असल्याने सभापती, उपसभापती बिनविरोध निवडले गेले. औसा आणि लातूरमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने निवडणूक घेण्यात आली. या दोन्हीही पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींच्या निवडीत काँग्रेसचा झेंडा फडकला.निलंगा : निलंगा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड बिनविरोध झाली. सभापतीपदी अजित माने, तर उपसभापतीपदी ज्ञानेश्वर वाकडे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निलंगा पंचायत समितीत १८ पैकी १६ सदस्य भाजपाचे आहेत. सभापती पदासाठी भाजपकडून अजित माने, उपसभापती पदासाठी ज्ञानेश्वर वाकडे यांचे नामनिर्देशनपत्र आले. विरोधी पक्षाकडून उमेदवारी अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोघांची सभापती व उपसभापती म्हणून बिनविरोध निवड घोषित केली. नूतन सभापती अजित माने हे मदनसुरी गणातून तर उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे हे कोकळगाव गणातून निवडून आले आहेत. हे दोन्ही गण औसा मतदारसंघातील आहेत. दोन्ही पदे औशाला मिळाल्याने निलंगा मतदारसंघावर अन्याय झाल्याची कुजबूज कार्यकर्त्यांत होती.