शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

८९२ शेतकऱ्यांची तुती लागवडीसाठी नोंदणी..!

By admin | Updated: May 19, 2017 00:27 IST

जालना :यंदा खरीप हंगामात तुती लागवड करण्यासाठी ८९२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकांसाठी केलेला खर्च व मिळणारे उत्पन्न पाहता शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. या दोन नगदी पिकांना पर्याय म्हणून यंदा खरीप हंगामात तुती लागवड करण्यासाठी ८९२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. गत काही वर्षांत जिल्ह्यात तुती लागवडीने मराठवाड्यात आघाडी घेतली आहे. लागवड व उत्पन्न पाहता येथे रेशिम मार्केट होऊ घातले आहे. याचा भागात म्हणून जिल्ह्यात हे क्षेत्र दोन हजार हेक्टरने वाढणार असल्याचा अंदाज रेशिम विभागाने व्यक्त केला. तुती लागवडीसाठी आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया करावी लागते. बँक खाते क्रमांक, आधारकार्ड व सातबारा आदी कागदपत्रे आॅनलाईन आल्यावर संबंधित शेतकऱ्यांचे लॉगईन अकाऊंट काढले जाते. मनरेगा अंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी तीन वर्षांसाठी २ लाख ९२ हजारांचे अनुदान देण्यात येते. तुती लागवड, प्रक्रिया व मजुरीसाठी हे अनुदान देण्यात येते. रेशीम विभागाचे प्रादेशिक संचालक दिलीप हाके म्हणाले, यंदा जालना जिल्ह्यात सुमारे ८९२ शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. रेशिम मार्केट होत असल्याने तुतीचे क्षेत्र सुमारे दोन हजार एकर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कॅशक्रॉप म्हणून आता तुतीचे पीक पुढे येत आहे. खरीप हंगामात अनेक शेतकरी तुती लागवडीला प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.