शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या रणधुमाळीस ७९ दिवस ?

By admin | Updated: June 13, 2014 00:38 IST

हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे.

हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे.राज्याच्या दहाव्या विधानसभेचा कार्यकाळ १७ आॅक्टोबर १९९९ रोजी संपला होता. त्यानंतर अकराव्या विधानसभेचा कार्यकाळ ३० आॅक्टोबर २००४ रोजी संपला. त्यानंतर आता चालू असलेल्या बाराव्या विधानसभेचा कार्यकाळ ३० आॅक्टोबर २०१४ रोजी संपणार आहे. तत्पुर्वी तेरावी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. २००९ मध्ये विधानसभा निवडणूकीची घोषणा ३१ आॅगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू झाली. १८ सप्टेंंबर २००९ रोजी या निवडणूकीची अधिसुचना जारी झाली होती. त्यानंतर १३ आॅक्टोबर रोजी राज्यातील ८२ हजार २८ मतदार केंद्रांवर मतदान झाले होते. तर २२ आॅक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. मागील विधानसभेचा कार्यकाळ लक्षात घेता यावेळी ३१ आॅगस्ट पुर्वी किंवा १ ते २ सप्टेंबर या कालावधीत तेराव्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ९ जून रोजी १ जानेवारी २०१४ या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवरील दावे व हरकती ९ ते ३० जून दरम्यान स्विकारण्यात येणार आहे. तसेच आलेल्या दावे व हरकतीची प्रकरणे १५ जुलै पर्यंत निकाली काढण्यात येणार असून २५ जुलै रोजी परिपुर्ण मतदार यादीचे अद्यावतीकरण केले जाणार आहे. ३१ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)राजकीय नेते मंडळींना ६८ दिवसांचा वेळविधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी राजकीय नेते मंडळींना अंदाजे ६८ दिवसांचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. लागलीच आचारसंहिता लागू होईल. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता २५ जून रोजी संपणार आहे. त्यानंतर साधारणपणे ३१ आॅगस्टपर्यंत नेते मंडळींना तयारीसाठी वेळ मिळणार आहे. या कालावधीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. काही राजकीय नेते मंडळींनी आतापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.तीन मतदारसंघात ८ लाख १४ हजार मतदारजिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीत ८ लाख १४ हजार २९३ मतदार आहेत. त्यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघात २ लाख ५८ हजार ५१६, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ७६ हजार ३६० आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ४१७ मतदार आहेत. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमामुळे या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.२००९ मध्ये ३१ आॅगस्ट रोजी झाली होती निवडणुकीची घोषणा१३ आॅक्टोबर २००९ रोजी मतदान झाल्यानंतर २२ आॅक्टोबर रोजी झाली होती मतमोजणीयावेळेसही ३१ आॅगस्टपुर्वी किंवा त्याच्या एक- दोन दिवसानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता.