शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

७६४ ग्राहक होणार सहआरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:47 IST

येथील महानगरपालिकेने वीज बिलापोटी महावितरणला दिलेल्या रक्कमेतून शहरातील ज्या ७६४ ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली, त्या सर्व ग्राहकांनी जाणूनबुजून या गुन्ह्याला अप्रत्यक्षरित्या मदत केल्यावरुन पोलीस तपासात त्यांना सहआरोपी केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेने वीज बिलापोटी महावितरणला दिलेल्या रक्कमेतून शहरातील ज्या ७६४ ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली, त्या सर्व ग्राहकांनी जाणूनबुजून या गुन्ह्याला अप्रत्यक्षरित्या मदत केल्यावरुन पोलीस तपासात त्यांना सहआरोपी केले जाणार आहे. या ७६४ ग्राहकांमध्ये शहरातील काही व्यापारी, प्रतिष्ठीत व्यक्ती व कर्मचाºयांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.परभणी येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश सटवाजी घोरपडे व महानगरपालिकेतील विद्युत विभागाचे सहायक अ़जावेद अ़ शकूर यांनी जानेवारी २०१५ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत महानगरपालिकेने वीज बिलापोटी महावितरणला दिलेल्या रक्कमेतील ७१ लाख २९ हजार ६७ रुपये खाजगी ७६४ ग्राहकांच्या वीज बिलात जमा करुन अपहार केला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता ज्या ७६४ खाजगी ग्राहकांची वीज बिले आरोपींनी मनपाच्या पैशातून जमा केली, त्या ७६४ ग्राहकांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी अप्रत्यक्षरित्या या गुन्ह्यामध्ये मूकसंमती दर्शवत गुन्ह्याला पाठबळ दिले. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ७६४ ग्राहकांमध्ये शहरातील काही नामांकित व्यापारी, काही लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठीत नागरिक आणि कर्मचाºयांचा समावेश असल्याचे समजते. त्यामुळे या ७६४ ग्राहकांपर्यंत पोहचल्यास पोलिसांना गेल्या किती वर्षांपासून हा प्रकार सुरु आहे, या बाबतची माहिती उघड होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस कितपत गांभीर्याने करतात, यावर बरेच अवलंबून आहे.धान्य घोटाळा प्रकरणात कोतवाली पोलिसांनी प्रारंभी अत्यंत गांभीर्याने तपास करुन ४ कोटी ९७ लाख रुपयांचा धान्य घोटाळा २८ कोटीपर्यंत गेल्याचे उघड केले होते. या गुन्ह्यात प्रारंभी आरोपींची संख्या २ असताना ती ३७ पर्यंत गेली होती. त्यानंतर या प्रकरणाचे न्यायालयात अत्यंत अभ्यासपूर्ण आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. कोतवाली पोलिसांकडून जसा तपास वरिष्ठ अधिकाºयांकडे गेला, तसा तो थंडावला. आता तर हा तपास ठप्प झाला आहे. धान्य घोटाळ्यातील आरोपी पोलिसांसोबत बसून गप्पा मारत आहेत. परंतु, त्यांना अटक करण्याची तसदी पोलीस घेत नाहीत. यामागचे गुपित वरिष्ठ पोलीस अधिकारी व त्या आरोपींनाच जास्त अवगत आहे. याच पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी महापालिकेच्या पैशाच्या अपहार प्रकरणाचा तपास केल्यास फुकटच्या पैशावर डल्ला मारुन पांढरे कपडे घालणाºयांचे पितळ उघडे पडणार आहे. हे प्रकरण राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता आहे.आता या दबावाला झुगारुन पोलीस चोखपणे तपास करणार की धान्य घोटाळ्याप्रमाणे आरोपींचे आदरतिथ्य करण्यात पोलीस मग्न राहणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.